Saturday, May 30, 2026
BusinessLatest News

एनएसई अकॅडमीची नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायजेससह (एनआय- एमएसएमई) उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी भागिदारी

एनएसई अकॅडमी लिमिटेड (एनएएल) या नॅशनल स्टॉक एक्सजेंचच्या (एनएसई) संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायजेस (एनआय- एमएसएमई), या एमएसएमई मंत्रालय, भारत सरकारच्या एमएसएमई व उद्योजकता विकास क्षेत्रातील आघाडीच्या संस्थेसह करार केला आहे.

या कराराअंतर्गत उद्योन्मुख उद्योजक, छोटे व्यवसाय मालक आणि व्यावसायिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण व सर्टिफिकेशनच्या माध्यमातून सक्षम केले जाणार आहे. त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल आणि आर्थिक धोरण विकसित करण्यासाठी, प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी व उद्योजकासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी मदत केली जाणार आहे. या कराराद्वारे अशी यंत्रणा उभारण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे, जी वैयक्तिक विकास साधेल व त्याचप्रमाणे मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायजेस क्षेत्राच्या विकासासाठी हातभार लावेल.

आर्थिक आणि संबंधित तंत्रज्ञानातील एनएसई अकॅडमीचे प्रशिक्षण कौशल्य आणि एनआय- एमएसएमईजा उद्योजक विकास क्षेत्रातील अनुभव यांच्या जोरावर या भागिदारीच्या माध्यमातून एमएसएमई क्षेत्रासाठी आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. त्यामध्ये आर्थिक व्यवस्थापन, मार्केटिंग, व्यवसाय नियोजन आणि कामकाजातील कार्यक्षमता यांवर भर देणारे निवासी आणि अनिवासी प्रशिक्षण शिबिरे घेतली जातील. या कराराद्वारे वैयक्तिक विकास साधणारी तसेच मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायजेस क्षेत्राच्या विकासासाठी हातभार लावणारी यंत्रणा उभारण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

याप्रसंगी एनआय- एमएसएमई, संचालक जनरल डॉ. सुंचू ग्लोरी स्वरूपा म्हणाल्या, ‘एनएसई अकॅडमीसह करण्यात आलेली ही भागिदारीने आमच्या एमएसएमई क्षेत्र बळकट करण्याच्या ध्येयाशी पूर्णपणे सुसंगत आहे. औद्योजकता विकास क्षेत्रातील आमचा अनुभव आणि एनएसई अकॅडमीचे आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण क्षेत्रातील कौशल्य यांची सांगड घालून आम्हाला एमएसएमईच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रभावी प्रशिक्षण देणे शक्य होईल. या उपक्रमाद्वारे देशभरातील व्यवसायांचा विकास आणि शाश्वततेसाठी हातभार लावता येईल.’

याप्रसंगी एनएसई अकॅडमी लि. चे सीईओ श्री. अभिलाष मिश्रा म्हणाले, ‘एनआय- एमएसएमईसह करण्यात आलेली भागिदारी अर्थव्यवस्थेचा कणा असलेले भारताचे एमएसएमई क्षेत्र बळकट करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. कौशल्य विकास आणि आर्थिक शिक्षण उपक्रमांवर लक्ष केंद्रित करत आम्ही उद्योजकतेला चालना देत त्यांना विकास व यश साध्य करण्यासाठी मदत करण्याचे ध्येय ठेवले आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading