Wednesday, November 18, 2026
Latest NewsTECHNOLOGY

मेड फॉर इंडिया ओप्पो एफ २९ सिरीज भारतात लॉन्च

अस्सल ड्यूरेबल चॅम्पियन ओप्पो एफ २९ सिरीज लॉन्च करून ओप्पो इंडियाने स्मार्टफोनचा टिकाऊपणा आणि नेटवर्कची विश्वासार्हता यांची नव्याने व्याख्या केली आहे. भारतासाठी बनवलेल्या आणि भारतात पारखलेल्या एफ २९ सिरीजमध्ये जागतिक दर्जाचे इंजिनियरिंग, मिलिट्री ग्रेडचा मजबूतपणा, उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि दमदार बॅटरी परफॉर्मन्स आहे.ओप्पो एफ २९ सिरीजमध्ये या उद्योगातील अत्युत्तम असे डस्ट आणि लिक्विड प्रोटेक्शन आहे . एफ २९ सिरीजसाठी सर्वोच्च अशा आयपी ६६, आयपी ६८ आणि आयपी ६९ मानकांचे परीक्षण भारतात एसजीएस , बंगळूर येथे करण्यात आले असून ही श्रेणी या सेगमेन्टमधील सर्वात दणकट स्मार्टफोनची श्रेणी असल्याचे दिसून आले आहे.

ओप्पो इंडियाचे हेड ऑफ कम्युनिकेशन्स सॅव्हिओ डिसूझा म्हणाले, “ओप्पो एफ २९ सिरीज ही खास करून भारतासाठी बनवण्यात आली आहे. हा एक खराखुरा टिकाऊ साथीदार आहे, जो ताकद, कनेक्टिव्हिटी आणि परफॉर्मन्स यांची सांगड घालतो. याच्या उद्योगातील सर्वोत्तम आयपी रेटिंग पासून आणि मिलिटरी ग्रेडच्या मजबुतीपासून ते आमच्या क्रांतीकारी हंटर अँटेना तसेच विशाल बॅटरीजपर्यंत या फोनचा प्रत्येक पैलू अशा रीतीने बनवण्यात आला आहे की, भारतातील रोड वॉरियर्ससाठी तो उपयुक्त ठरेल. या सेगमेन्टमध्ये नवीन मापदंड स्थापित करणाऱ्या या फोनची सगळी ताकद एका स्लिम आणि स्टायलिश डिव्हाईसमध्ये ठासून भरली आहे.”

एफ २९ सिरीजचा इंचन् इंच संरक्षणासाठी बनवण्यात आला आहे. याच्या ३६०° आर्मर बॉडीमध्ये स्पॉन्ज बायोनिक कुशनिंग आहे, जे फोन खाली पडल्यास तो आघात शोषून घेते. तसेच त्याचे वर उपसलेले फायबर ग्लासचे बनलेले बॅटरी कव्हर आणि मजबूत साइड फ्रेम्स त्याला स्ट्रक्चरल मजबुती देतात, तर मजबूत अशी लेन्स प्रोटेक्शन रिंग कॅमेऱ्याचे रक्षण करते. एफ २९ बेस मॉडेलमध्ये ६५०० एमएएच ४५ वॉट सुपरव्हूक ™️ फास्ट चार्जिंग बॅटरी आणि प्रो आवृत्तीत ६००० एमएएच ८० वॉट सुपरव्हूक ™️ फास्ट चार्जिंग बॅटरसह एफ २९ सिरीजमध्ये पहिल्यांदाच एक मोठी बॅटरी देऊन एफ २९ सिरीजने नवीन मापदंड स्थापित केला आहे.

हे दोन्ही स्मार्टफोन रिव्हर्स चार्जिंगला समर्थन देतात. ज्यांना फोटो काढायला खूप आवडते, त्यांच्यासाठी ओप्पो ने एफ २९सिरीजमध्ये एक अंडरवॉटर फोटोग्राफी मोड दिला आहे. विद्यार्थी आणि भारतातील युवा कार्यबलासाठी ओप्पो एफ २९सिरीजमध्ये अनेक जेनएआय फीचर्स आहेत, जी सुलभ उत्पादकता सुनिश्चित करतात. याच्या डॉक्युमेंट्स अॅपमध्ये एआय समरी, एआय रिराइट आणि एक्स्ट्रॅक्ट चार्ट सारखी टूल्स आहेत, जी तरुण व्यावसायिकांचे खास सोबती बनू शकतात.

एआय टूलबॉक्स २. ० मध्ये स्क्रीन ट्रान्सलेटर, एआय राइटर,एआय रिप्लाय आणि एआय रेकॉर्डिंग समरी यासारखी उत्पादकता देणारी फीचर्स आहेत. ही टूल्स तब्बल पाच तासांपर्यंत ऑफिस मीटिंग्जचे – इंग्रजी, हिंदी आणि तमिळ भाषेत रेकॉर्डिंग करू शकतात आणि नोंदी, सारांश आणि ट्रान्सस्क्रिप्ट जनरेट करू शकतात.

एफ २९ हा फोन प्रीमियम सॉलिड पर्पल आणि ग्लेशियर ब्लू रंगात उपलब्ध आहे. एफ २९ ५ जी दोन व्हॅरियन्टमध्ये उपलब्ध असेल. ८ जीबी +१२ जीबी आणि ८ जीबी +२५६ जीबी व्हॅरियन्टसाठी अनुक्रमे २३, ९९९ / २५, ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. दुसरीकडे, ओप्पो एफ २९ प्रो हा फोन मार्बल व्हाइट आणि ग्रॅनाइट ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल .एफ २९ प्रो ५ जी ची किंमत८ जीबी + १२८ जीबी ८ जीबी + २५६ जीबी, १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटसाठी २७,९९९/२९,९९९/३१,९९९ रुपये असून ओप्पो ई-स्टोअर, फ्लिपकार्ट, ऍमेझॉन आणि मेनलाइन रिटेल आउटलेटवर २९ मार्च रोजी संध्याकाळी ६वाजता उपलब्ध होतील

Leave a Reply