Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

पुणेकरांनी अनुभवला ‘सिंफनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडिया’

‘एनसीपीए ॲट दि पार्क’ या कार्यक्रमाद्वारे पुण्यात ऑर्केस्ट्रा आणि नृत्याविष्कार संपन्न

पुणे : भारतातील पहिला व एकमेव व्यावसायिक ऑर्केस्ट्रा अशी ओळख असलेला ‘सिंफनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडिया’ (एसओआय) आणि सुप्रसिद्ध नर्तक पी प्रवीण कुमार यांच्या ‘नृत्योल्हास’ या कार्यक्रमाने पुणेकरांना पाश्चिमात्य आणि पारंपारिक संगीताची अनुभूती दिली. निमित्त होते मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एनसीपीए ॲट दि पार्क’ या उपक्रमाचे. नगर रस्त्यावरील फिनिक्स मार्केटसिटीमधील लिबर्टी स्क्वेअर येथे नुकतेच या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रस्तुत झालेल्या अतिशय मनमोहक आणि थरारक कलाकृतींनी रसिक प्रेक्षकांना मोहिनी घातली.

‘सिंफनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडिया’ च्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यांनी एकापेक्षा एक अशा अविस्मरणीय कलाकृती सादर केल्या. यावेळी कलाकारांनी सादर केलेल्या लोकप्रिय हिंदी गाण्यांमुळे रसिकांना संगीताची अद्भुत पर्वणी अनुभवयास मिळाली. त्यानंतर हिंदी आणि पाश्यात्य संगीताचा सुरेख मिलाफ असलेली गाणी सादर झाली ज्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आणि टाळ्यांचा कडकडात कलाकारांची प्रशंसा झाली.

यानंतर ‘नृत्योल्हास’ या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक पी प्रवीण कुमार यांचे विलोभनीय नृत्य प्रस्तुतीकरण झाले. याद्वारे भारतीय नृत्यामधील सौंदर्याची अनुभूती उपस्थितांना मिळाली. पी प्रवीण कुमार यांनी सादर केलेली ही कलाकृती भक्ती, कथाकथन आणि भावपूर्ण हालचालींचा परिपूर्ण सुसंवाद यांचा सुरेख मिलाफ होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading