Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान झाला नाही का? जया बच्चन यांचा शिंदेंना सवाल

मुंबई:  तुम्ही तुमचा मूळचा पक्ष सोडून सत्तेत असलेल्या पक्षासोबत गेलात त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान झाला नाही का, असा सवाल करीत विख्यात अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याचे समर्थन केले आहे.

कुणाल कामरा याने तयार केलेल्या एका व्यंगात्मक गाण्यावरून सध्या राज्यात मोठा वाद उफाळून आला आहे. या गाण्यात शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्यात आल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कुणच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. 

अशा आवाज दडपण्याच्या प्रकारांविरोधात माध्यमांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. बोलण्यावर बंदी घालण्यात आली तर माध्यमांचे काय होणार? आधीच माध्यमांची परिस्थिती वाईट आहे. माध्यमांवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात येत आहेत. उद्या, ही बातमी घ्या, ती घेऊ नका, असे सांगायला लागतील, असे जया बच्चन प्रसार माध्यमांना उद्देशून म्हणाल्या. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्य अस्तित्वात आहे कुठे, असा सवाल करून जया बच्चन म्हणाल्या की, फक्त सत्ताधाऱ्यांनाच कोणतीही कारवाई करण्याचे स्वातंत्र्य आहे. कुठे काही खटकले की विरोधकांना मारहाण करा. महिलांवर अत्याचार करा. त्यांना वाईट वागणूक द्या. त्यांची हत्या करा. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading