Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएमएलच्या न.ता.वाडी आगारामध्ये आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : महाराष्ट्र राज्यात दरवर्षी रक्ताचा तुटवडा भासतो ही बाब विचारात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  दिपा मुधोळ-मुंडे यांच्या संकल्पनेतून ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे उपचार करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी उद्दात्त हेतूने व सामाजिक बांधिलकी म्हणून परिवहन महामंडळाच्या सर्व डेपो, दोन्ही मुख्यालये तसेच मुख्य प्रशासकीय कार्यालय येथे क्रमानुसार प्रत्येक महिन्यात एका ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत आहे.

परिवहन महामंडळाच्या अप्पर आगारामध्ये शुक्रवार, दि. २१/०३/२०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य रक्तदान शिबिरात एकूण ९७ पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. पुणे व पिंपरी चिंचवड शहर, शहरांलगतची उपनगरे व पीएमआरडीए क्षेत्रात “लाईफलाइन” अशी ओळख असलेल्या पीएमपीएमएलने यापूर्वीही परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदानाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरवासियांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा पीएमपीएमएलने जोपासली आहे.
सदर रक्तदान शिबीर यशस्वी होणेसाठी परिवहन महामंडळाचे मा. सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रज्ञा पवार-पोतदार, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (कमर्शियल)  दत्तात्रय झेंडे, प्रशासन अधिकारी  मोहन दडस व कामगार व जनता संपर्क अधिकारी  किशोर चौहान यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर आगाराचे आगार व्यवस्थापक  सचिन वाबळे, यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading