Saturday, May 30, 2026
BusinessLatest News

बिर्ला पुण्य या आलिशान निवासी प्रकल्पासह बिर्ला इस्टेट्सचा पुण्यात प्रवेश

पुणे, : आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेडची 100% पूर्ण मालकीची उपकंपनी बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडने बिर्ला पुण्य हा पुण्यातील त्यांचा पहिला प्रकल्प सुरू केला असून त्याची अंदाजे महसूल क्षमता 2700 कोटी रु. आहे. मध्य पुण्यातील (संगमवाडी) स्थित हा प्रकल्प कंपनीचा पुण्यातील पहिला निवासी प्रकल्प आहे. 5.76 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या  हा प्रकल्पात 1.6 दशलक्ष चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र असून त्यामध्ये 1000 विशेष फ्लॅट्स तयार करण्यात येणार आहेत. हे फ्लॅट्स प्रशस्त आणि आधुनिक जीवनशैलीसाठी तयार करण्यात आले आहेत. पुण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसास्थानिक जैवविविधता आणि स्थापत्यशैलीची प्रेरणा घेऊन या प्रकल्पात विचारपूर्वक डिझाइन केलेल्या टॉवर्समध्ये 1 बीएचके ते बीएचके पर्यंतच्या आलिशान निवासी अपार्टमेंट्स असतीलहा प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित केला जाणार असून पहिल्या टप्प्यात दोन टॉवर्स आणि 500 युनिट्सचा समावेश असेल.

अतुलनीय जीवन राहणीमान अनुभव मिळण्यासाठी निसर्गसंस्कृती आणि वास्तुकला यांचा उत्तम मिलाफ साधत मध्य पुण्यात संगमवाडी येथे वसलेला बिर्ला पुण्य प्रकल्प कंपनीच्या LifeDesigned® तत्वज्ञानाचे उदाहरण आहे. शिवाजीनगरकोरेगाव पार्क आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ या पुण्यातील महत्त्वाच्या केंद्रांशी उत्कृष्ट कनेक्टीव्हीटी असलेला हा प्रकल्प शहराच्या चैतन्यमयी जीवनशैलीशीही जोडून ठेवेल हे सुनिश्चित करतो. मुळा-मुठा रिव्हरफ्रंटला थेट प्रवेशमेट्रो स्थानक जवळ असणे आणि हिरवाईच्या निसर्गरम्य वातावरणामुळे बिर्ला पुण्य मध्ये शहरी सुविधा आणि निसर्ग यांचा समतोल साधला गेला आहे. शहराचा वारसा  आणि आधुनिक आकांक्षांचा सुंदर मिलाफ साधणारा हा प्रकल्प सुयोग्य नियोजन आणि कालातीत सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहेत्यायोगे तो शहरातील सर्वाधिक मागणी असलेल्या निवासी स्थळांपैकी एक म्हणून स्वतःला प्रस्थापित करत आहे.

या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी बिर्ला इस्टेट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. के. टी. जिथेंद्रन  म्हणाले, “माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि मजबूत पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुण्याच्या रिअल इस्टेट बाजारपेठेची सातत्याने भरभराट होत आहे. त्यामुळे प्रीमियम घरांसाठीची मागणी वाढत आहे. तसेचमहाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात आता अधिक उच्चस्तरीय जीवनशैलीचा स्वीकार केला जात आहेती आमच्या प्रकल्पाच्या डिझाइनसाठीची प्रेरणा आहे. बिर्ला पुण्यच्या माध्यमातून आम्ही समकालीन आधुनिक आलिशान घरे आणि पुण्याच्या कालातीत मोहकतेचा समतोल साधत उच्चस्तरीय राहणीमानाचा नवा मापदंड स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”

आरामदायी आणि सर्वसमावेशक जीवनशैली अनुभव मिळवून देण्यासाठी बिर्ला पुण्य मध्ये 50 हून अधिक जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतीलजोडीला प्रकल्पाच्या टेरेसवरील रिटेल विलेजमध्ये अल्फ्रेस्को (खुल्या जागेतील) F&B आणि रिटेल स्पेसेस तसेच एक रिव्हरसाइड प्रोमनेड देखील असेलसार्वजनिक कार्यक्रम तसेच लोकांना एकत्र येण्यासाठी ते उत्तम ठिकाण असेल. बिर्ला पुण्य हे शाश्वत जीवनशैलीसाठी वचनबद्ध असून पावसाचे पाणी साठवणेसौरऊर्जेचा वापर आणि कार्यक्षम कचरा व्यवस्थापन प्रणाली यांसारख्या पर्यावरणपूरक उपायांचा समावेश आहे.

बिर्ला इस्टेट्स हे भारतातील सर्वाधिक मागणी असलेल्या रिअल इस्टेट बाजारपेठेत आपले  स्थान  वाढवत आहे. पुणे बाजारपेठेवर मोठी गुंतवणूक करत कंपनीने गेल्या वर्षी मांजरीपुणे येथे 16.5 एकर (3.1 दशलक्ष चौरस फूट) जागेचा भूखंड संपादन केला. त्याचप्रमाणेअलीकडेच बिर्ला अरिका आणि बिर्ला ईव्हराचा शुभारंभ करत कंपनीने अनुक्रमे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) आणि बंगळुरूवर लक्ष केंद्रित केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading