Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त वन्यजीव छायाचित्रकार विनोद बारटक्के यांचे व्याख्यान व कार्यशाळा

 

पुणे : जागतिक वन दिनाचे औचित्य साधत जंगल बेल्स आणि कॅनन इंडिया यांच्या वतीने एक विशेष व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार विनोद बारटक्के हे यावेळी उपस्थितांना संबोधित करतील. सदर व्याख्यान व कार्यशाळा शुक्रवार, दिनांक २१ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ या काळात एरंडवणे भागातील सेवाभवन येथे संपन्न होईल. कार्यक्रमत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क नाही. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. विनोद बारटक्के हे वन्यजीव छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध असून ते यावेळी स्पिती येथील स्नो लेपर्ड एक्सपेडिशन बद्दल अनुभव कथन करतील. त्यानंतर कॅनन इंडियाच्या वतीने वन्यजीव छायाचित्रण याविषयी कार्यशाळा घेण्यात येईल.

जागतिक वन दिवस हा दरवर्षी २१ मार्चला साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने नोव्हेंबर २०१२ मध्ये अशा प्रकारे जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading