५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्यसरकारचे आभार – जगदीश कदम
पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या कामांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केल्याबद्दल महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र सरकारचे आभार मानते अशा शब्दांत प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केला.
शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी किमान २८० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून राज्य सरकारने केलेल्या तरतुदीमुळे ही कामे आता वेगाने पूर्ण होण्यास निश्चितच मदत होणार आहे. निधी मिळाल्यानंतर येत्या दोन वर्षांत शिवसृष्टीचे काम वेगाने पूर्ण होईल, असा विश्वास देखील यावेळी कदम यांनी व्यक्त केला.
