Sunday, May 31, 2026
Latest NewsPUNE

शालेय विद्यार्थिनी सिध्दा पांडे हिने लिहिलेल्या द स्काय इस अ बिलिफ पुस्तकाचे प्रकाशन

 

पुणे  : पुण्यातील द न्यू इंडिया स्कुल येथे इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या सिध्दा पांडे या विद्यार्थिनीने लिहिलेल्या द स्काय इस अ बिलिफ हे पुस्तक डिजिटल स्वरूपात प्रकाशित झाले आहे.लहान मुलांसाठी आघाडी सर्जनशील व्यासपीठ असलेल्या ब्रायबुक या फ्लॅटफॉर्मवर डिजिटल स्वरूपात हे पुस्तक उपलब्ध आहे.सिध्दा पांडे हिचे इंग्रजी भाषेतील 108 पानांचे हे पुस्तक असून काल्पनिक कथेवर आधारित आहे.नाती आणि मैत्री ही फक्त आपल्या वयोगटातील लोकांशीच नव्हे तर कुणाशीही होऊ शकते.या कथेमध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षकांबरोबर मैत्री करून आयुष्यातील अमुल्य धडे मिळण्याची आशा बाळगतो,पण या मैत्रीमध्ये विद्यार्थीच शिक्षकांचा मार्गदर्शक बनतो.


पुस्तकाबाबत माहिती देताना सिध्दा पांडे म्हणाली की,लहानपणापासूनच मला लिहिण्याची आवड होती व मी कविता लिहायचे.या आवडीमुळेच माझे पहिले पुस्तक मी आणू शकले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading