Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

संविधान सन्मान संमेलनाचे पुण्यात आयोजन

विकास दिव्यकिर्ती यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे – संविधानाच्या मूल्यांना सन्मान देण्यासाठी आयोजित संविधान सन्मान संमेलन यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात होणार आहे. प्रबुद्ध भारत आणि बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजप्रबोधनकार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक माजी सनदी अधिकारी विकास दिव्यकिर्ती यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर असणार आहेत.

विकास दिव्यकिर्ती हे भारतभर UPSC मार्गदर्शक, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. दृष्टी IAS या प्रतिष्ठित संस्थेचे संस्थापक असलेल्या दिव्यकिर्ती यांनी हजारो विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षित केले आहे. त्यांचे संविधान, समाजशास्त्र आणि प्रशासनशास्त्र यावरील मार्गदर्शन विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांच्या सहज आणि स्पष्ट शैलीमुळे ते युवा पिढीमध्ये प्रेरणादायी वक्ते म्हणून ओळखले जातात.

संमेलनात संविधानाच्या विविध अंगांवर तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे आणि संवाद होणार आहेत. सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाबाबत सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रबुद्ध भारतच्या संपादक मंडळाकडून कळवण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading