महाकुंभात स्नान करण्याचे विशेष महत्त्व – ध्यानगुरु रघुनाथ गुरुजी
अध्यात्मात विज्ञानाची शोध मोहीम : महाकुंभ मेळा विशेष
प्रयागराज येथे दर 12 वर्षांनी महाकुंभ मेळा भरतो. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी तीन वर्षांच्या अंतराने कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. 2025 साली प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन झाले. 13 जानेवारी 2025 पासून हा भव्य मेळा सुरू झाला. अंदाजे 40 कोटीहून अधिक भाविक संगमात स्नानासाठी आले होते असा प्राथमिक अंदाज आहे.
महाकुंभाचे आध्यात्मिक, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व :
ध्यानगुरु रघुनाथ गुरुजी सांगतात की, सागरमंथनाच्या वेळी अमृताचा कलश निघाला होता. त्या कलशावर अधिकार मिळवण्यासाठी देव-दानवांमध्ये 12 दिवसीय भीषण युद्ध झाले. त्या वेळी अमृताचे चार थेंब पृथ्वीवर पडले. ते ठिकाण म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. देवांचा 12 दिवसांचा काळ पृथ्वीवरील 12 वर्षांच्या कालखंडासम अनुकूल असतो.
ग्रहयोग आणि कुंभ मेळा :
सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि गुरु ग्रह विशिष्ट सहयोगात असतात. या कालखंडात:
• 3 जानेवारीला सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो.
• 14 जानेवारीला मकरसंक्रांती होते, ज्यामुळे उत्तरायण सुरू होते.
• पौष पौर्णिमेस गुरु ग्रह कुंभ राशीत प्रवेश करतो.
सूर्य चक्र आणि गुरु ग्रहाचे गुरुत्वाकर्षण या कालावधीत एकत्रित प्रभाव टाकतात. सूर्याचा सोलर सायकल दर 12 वर्षांनी उत्तर आणि दक्षिण ध्रुवांमधील मॅग्नेटिक फिल्डमध्ये बदल करतो, तसेच पृथ्वी वरील चुंबकीय वाऱ्यांना पवित्र गंगा, यमुना आणि सरसस्वती या नद्यांचे पाणी चुंबकीय वारे मैग्नेटिक फील्डला कट करतात. ‘फरेदेस इलेक्ट्रो मॅग्नेटक लॉ’नुसार इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो आणि ईश्वर साधू, संत तपस्वीचे आशीर्वाद, अध्यात्मिक शक्ती एकत्रित येतात त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
वैज्ञानिक दृष्टिकोन :
1. थंड हवामानामुळे ऑक्सिजन मॉलिक्युल्सची घनता जास्त असते, त्यामुळे शुद्ध हवा मिळते.
2. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांच्या संगमाच्या पाण्यात डिसॉल्व्ड ऑक्सिजन (DO) आणि खनिजांची पातळी योग्य प्रमाणात वाढते या ऑक्सीजन मोलुकुल्स च्या हवेतील घनतेमुळे पाण्यातील DO ची पातळी वाढते जे आरोग्यासाठी लाभदायक असते.
3. गुरु ग्रहाचे गुरुत्वाकर्षण, सूर्याचे सोलर सायकल, आणि मॅग्नेटिक फिल्ड, सुमन रिझोनेंक्स फ्रिक्वान्सीमुळे माणसाच्या मेंदूतील अल्फा वेव्ह ८ ते १२ hz वाढवते. त्यामुळे मनःशांती, विश्रांती, आणि निरोगी जीवन मिळते.
कुंभ स्नानाचे महत्त्व :
ध्यानगुरु रघुनाथ गुरुजी यांच्या मते,
• कुंभ मेळ्यात स्नान केल्याने गुरु, सूर्य, पृथ्वी, चंद्र यांच्या सकारात्मक ऊर्जा लहरी शरीरात प्रवेश करतात.
• ईश्वर साधू-संतांचे आशीर्वाद आणि अमृततुल्य वातावरणामुळे मनःशांती आणि निरोगी जीवनाचा अनुभव येतो.
• जलातील pH, DO टीडीएस व खनिजांचा योग्य संतुलन शरीराला लाभदायक ठरतो. तसेच सूर्या किरण गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांचा संगम पाण्याच्या आतील वनस्पतीच्या आयोगाने फोटो सिंटेटिक इफेकमुळे ऑक्सीजन सोडतात त्या मुळे पाण्याची डिज़ाल्व ऑक्सीजन वाढते जे आरोग्य साठी लाभदायक ठरते.
यामुळे कुंभ मेळ्यात स्नान करणे हे केवळ धार्मिकच नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
