Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

वनराईचे वार्षिक स्नेह संमेलन शनिवारी; ५० शाळेतील ४०० विद्यार्थी होणार सहभागी  

पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या वनराई संस्थेचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांचे यंदा  जन्मशताब्दी वर्षे आहे. या निमित्त येत्या शनिवारी (१५ फेब्रुवारी)  वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे.  या स्नेह संमेलनात पुणे, वनराई इको क्लब अंतर्गत वनराई पर्यावरण शिक्षण कार्यक्रम संपन्न होणार आहे, यामध्ये पर्यावरण क्षेत्रात विशेष उल्लेखनीय उपक्रम करणाऱ्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाईल. तसेच पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या स्नेह संमेलनात ५० शाळेतील ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

वनराई पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंतर्गत विविध पर्यावरणीय उपक्रमांचे आयोजन १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९:१५ ते दुपारी ३:०० यावेळेत सानेगुरुजी स्मारक मंदिर, पर्वती पायथा, पुणे येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:म्हणजे,  कलेच्या माध्यमातून पर्यावरणीय संदेश देण्याचे अनोखे चित्रकला सादरीकरण केले जाणार आहेत, पर्यावरणीय संदेश देणारी गीते सादर केली जातील. तसेच पर्यावरण जागरूकतेवर आधारित संदेश देणारी नाटिकांचे सादरीकरण होणार आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रातील सृजनशील आणि शैक्षणिक प्रकल्पांची देवाणघेवाण या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading