भारतातील सर्वात मोठी कॉर्पोरेट गव्हर्नन्स एक्सलन्स समिट आणि अवॉर्ड्स २०२५ चे आयोजन
पुणे : वर्ल्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (WDC)व डायरेक्टर्स इन्स्टिट्यूट- वर्ल्ड कौन्सिल ऑफ डायरेक्टर्स (Directors’ Institute – World Council of Directors)ह्यांच्या पुढाकाराने आणि वर्ल्ड असोसिएशन फॉर स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेस (WASME)यांच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठी कॉर्पोरेट गव्हर्नन्स एक्सलन्स समिट आणि अवॉर्ड्स २०२५ चे आयोजन करण्यात आले. पुण्यात झालेल्या या परिषदेमध्ये १००० हून अधिक सीएक्सओ आणि ३५ पेक्षा अधिक आघाडीच्या सर्च फर्म्सने सहभाग घेतला .
ESG(पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स क्षेत्रात , नैतिक आणि नाविन्यपूर्ण नेतृत्वाचा गौरव आला .
या सत्रांमध्ये सुरेश प्रभू, एम. दामोदरन आणि योगेश कदम यांच्यासह १५+ राष्ट्रांच्या राजदूतांनी शाश्वतता आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर वर आपले विचार मांडलेत.
या शिखर परिषदेत वकीली आणि न्यायदान पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स -चालित संकेतस्थळ – लॉटेक (www.law-tech.co.in) आणि वरिष्ठ सीएक्सओ किंवा बोर्ड पदांचा शोध सुलभ करण्यासाठी व पारंपारिक पद्धतींद्वारे सहज उपलब्ध नसलेल्या उच्च-स्तरीय वरिष्ठ नेत्यांचे भांडार म्हणून काम करणारे संकेतस्थळ बोर्डसर्च (BoardSearch.ai), ह्या अत्याधुनिक व्यासपिठांचे अनावरण करण्यात आले.
प्रशासन आणि नेतृत्वकौशल्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ५० हून अधिक प्रतिष्ठित बोर्ड सदस्यांना “प्रेरणादायी बोर्ड संचालक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. विविधता आणि ट्रान्सजेंडर प्रतिनिधित्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सुहासिनी सुरेश सावंत यांना “जबाबदार आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याव्यतिरिक्त, जागतिक प्रशासन, नवनिर्मितीमध्ये नेतृत्व करण्याची त्यांची तयारी दर्शविणाऱ्या २५० हून अधिक अधिकाऱ्यांना स्वतंत्र संचालक (Independent Director) आणि आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट संचालक (International Corporate director) या पदव्या प्रदान करण्यात आल्या.
