२०२५ हे इलेक्ट्रिक वाहनांचे वर्ष असणार
मुंबई : माहिती तंत्रज्ञान, कन्सल्टिंग आणि व्यवसाय उपाययोजना पुरवणारी, जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसने (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासामध्ये आढळून आले आहे की, दर १० पैकी ६ (६४%) ग्राहक त्यांचे पुढचे वाहन म्हणून इलेक्ट्रिक वाहनाची निवड करण्याची दाट शक्यता आहे. टीसीएस फ्युचर-रेडी इमोबिलिटी स्टडी २०२५ हा सर्वसमावेशक अहवाल इलेक्ट्रिक वाहने शाश्वत मोबिलिटीच्या भविष्याला कशाप्रकारे आकार देत आहेत ते दर्शवतो, ६०% ग्राहकांचे मत आहे की, चार्जिंग पायाभूत सोयीसुविधा हे एक खूप मोठे आव्हान आहे पण ५६% ग्राहक इव्हीसाठी ४०,००० डॉलर्सपर्यंत खर्च करायला तयार आहेत हे देखील या अभ्यासामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.
या अभ्यासामध्ये उत्तर अमेरिका (यूएसए, कॅनडा), युके आणि आयर्लंड, कॉन्टिनेन्टल युरोप (बेल्जीयम, डेन्मार्क, फिनलॅन्ड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलॅन्ड्स, नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड) आणि एपीएसी (चीन, भारत, जपान, एएनझेड) मधील १३०० पेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी करून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ट्रान्सपोर्ट मॅन्युफॅक्चरर्स, चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधा पुरवणाऱ्या कंपन्या, फ्लीट ऍडॉप्टर्स, ग्राहक आणि इव्ही अडॉप्शन इन्फ्ल्यूएंसर्स यांचा समावेश होता.
या अभ्यासानुसार, सस्टेनेबिलिटी व कमी ऑपरेशनल खर्च हे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला चालना देणारे प्रमुख घटक आहेत. ‘पर्यावरणात्मक सस्टेनेबिलिटी’ ही इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यामागची प्रेरणा असल्याचे ग्राहक आणि इन्फ्ल्यूएंसर्सनी सांगितले असले तरी इलेक्ट्रिक वाहनांमुळे मिळणारे पर्यावरणात्मक लाभ अनेक इव्ही इन्फ्ल्यूएंसर्सच्या अपेक्षांबरहुकूम नाहीत. जवळपास ४८% इव्ही इन्फ्ल्यूएंसर्सनी सांगितले की, इव्ही एकूण कार्बन आउटपुट जितके ते कमी करतात तितकेच वाढवतात, १०% लोकांनी असेही म्हटले आहे की ईव्हीचा वापर पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करत आहे. व्यावसायिक फ्लीट्सचा इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. बरीच मोठी टक्केवारी, जवळपास ५३% जणांचे म्हणणे आहे की कमी ऑपरेटिंग खर्च ही इव्ही खरेदी करण्यामागची एक मोठी प्रेरणा आहे. वाहनांचे ताफे चालवणाऱ्या कंपन्या पारंपारिक इंटर्नल कंबश्चन इंजिन (ICE) वाहनांच्या तुलनेत इव्हीसाठी प्रीमियम भरण्यास तयार आहेत.
कमिन्सचे ग्लोबल चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर अर्ल न्यूसम म्हणाले, “मोबिलिटीचे भविष्य इलेक्ट्रिक, कनेक्टेड आणि सस्टेनेबल आहे, असे परिवर्तन जे उद्योगक्षेत्र आणि समाज या दोन्हींमध्ये आमूलाग्र कायापालट घडवून आणते. टीसीएस फ्युचर-रेडी इमोबिलिटी स्टडी २०२५ मध्ये या वाटचालीला आकार देणाऱ्या संधी व आव्हाने यांचे सुस्पष्ट चित्र दिसून येते, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता, नावीन्य व सहयोग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला जातो. कमिन्समध्ये आमच्या डेस्टिनेशन झीरो धोरणाला अनुसरून आम्ही वीज सुविधांच्या एका विशाल श्रेणीसह संपूर्ण उद्योगक्षेत्रामध्ये डिकार्बनायजेशनला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहोत. नवीन झीरो कार्बन उपाययोजना आणून, सहयोग निर्माण करत तंत्रज्ञान पुरवण्याची आमची क्षमता मोबिलिटीचे शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी मोठा हातभार लावेल.”
ग्राहकांमध्ये इव्हीबद्दल रुची वाढत असली तरी खासकरून चार्जिंगच्या सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानातील प्रगतीच्या बाबतीत काही महत्त्वाची आव्हाने आहेत. ७४% इव्ही उत्पादकांनी सांगितले की, चार्जिंगच्या योग्य सोयीसुविधांची कमतरता हा खूप मोठा अडथळा आहे जो इव्ही बाजारपेठेची वृद्धी रोखतो, ५५% जणांनी बॅटरी तंत्रज्ञान प्रगतीमध्ये नावीन्य आणण्यासाठी गुंतवणूक आधीच सुरु केली आहे. जवळपास ७८% जण इव्हीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वाहनांची किंमत कमी करण्यासाठी गुंतवणूक करत आहेत.
टीसीएसचे मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे अध्यक्ष अनुपम सिंघल म्हणाले, “इलेक्ट्रिक वाहन उद्योगक्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडून येत आहेत, व्याप्ती आणि सुधारणा वेगाने वाढत आहेत. दोन-तृतीयांश ग्राहक त्यांचे पुढचे वाहन म्हणून इव्हीची निवड करण्यासाठी उत्सुक असले तरी उत्पादकांना बॅटरी तंत्रज्ञान, वाहनांचे डिझाईन आणि उत्पादनाचे अर्थकारण यामध्ये अनेक आव्हाने झेलावी लागत आहेत. टीसीएसमध्ये आमचे फ्युचर-रेडी मोबिलिटीचे व्हिजन एआय आणि जेन एआयच्या मदतीने एक आतून जोडलेली इकोसिस्टिम निर्माण करण्यावर भर देते, स्मार्ट निर्णय, प्रगत ग्राहक अनुभव, शाश्वत उपाययोजना यांना चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या महत्त्वाच्या आव्हानांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करून आम्ही इलेक्ट्रीफाईड आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने जागतिक परिवर्तनाला वेग प्रदान करत आहोत.”
या सर्वेक्षणात आढळून आले आहे की, ९०% उत्पादक असे मानतात की, बॅटरी तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे रेन्ज आणि चार्जिंगचा वेग वाढेल आणि येत्या भविष्यकाळात इव्हीचे डिझाईन व कामगिरी यावर लक्षणीय प्रभाव पडेल.
टीसीएस फ्युचर-रेडी इमोबिलिटी स्टडी २०२५ सर्वेक्षणातील प्रमुख निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत –
- ९०% इव्ही उत्पादक व ८४% इव्ही इन्फ्ल्यूएंसर्स म्हणतात की, बॅटरी तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे रेंज आणि चार्जिंगचा वेग वाढेल आणि इव्हीचे डिझाईन व कामगिरी यावर लक्षणीय प्रभाव पडेल.
- ७४% उत्पादक मानतात की, चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधांची कमतरता हा इव्ही बाजारपेठेची वाढ रोखणारा प्रमुख अडसर आहे.
- ७२% इव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना इव्ही क्षेत्रात लक्षणीय विलय होण्याची अपेक्षा आहे, यामध्ये आर्थिक व्यवहार्यता व वाढीतील आव्हाने हे प्रमुख घटक असतील.
- ४१% ग्राहकांचे म्हणणे आहे की एकदा चार्ज केल्यावर इव्हीची रेन्ज २०० ते ३०० मैल असायला हवी तर ३१% जणांचे म्हणणे आहे की ३०० ते ४०० मैल ही अधिक चांगली डील आहे.
- ६३% इव्ही इन्फ्ल्यूएंसर्स म्हणतात की, इव्ही स्वीकारण्यामागचे त्यांचे प्रमुख कारण आहे नेट-झीरो उद्दिष्ट्ये पूर्ण करणे आणि कार्बन फूटप्रिंट कमी करणे.
- ५५% इव्ही उत्पादक बॅटरी तंत्रज्ञानात प्रगती घडवून आणण्यासाठी संशोधन व विकासामध्ये गुंतवणूक करत आहेत तर ७८% जण वाहनांची किंमत कमी करण्यासाठी गुंतवणूक करत आहेत.
- ७२% यूएस ग्राहक त्यांचे पुढचे वाहन म्हणून इव्ही खरेदी करण्याची दाट शक्यता आहे तर जपानी ग्राहकांमध्ये हेच प्रमाण ३१% आहे.
इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेने वेगाने पुढे जात असलेल्या आजच्या जगात, टीसीएसचे भविष्यासाठी सज्ज मोबिलिटीसाठीचे व्हिजन तंत्रज्ञानातील नावीन्य, धोरणात्मक सहयोग आणि सखोल नैपुण्ये यांना एकत्र आणून उत्पादक व इव्ही हितधारकांना परिवर्तन घडवून आणण्यासाठी सक्षम बनवते. टीसीएस संपूर्ण मोबिलिटी मूल्य शृंखलेमध्ये बदलाला चालना देते, वाहनाच्या डिझाईनपासून गिगाफॅक्टरी प्लॅनिंग ते डिजिटल प्लॅटफॉर्म्स, जनरेटिव्ह एआय आणि ग्राहकांना वैयक्तिक अनुभव प्रदान करण्यापर्यंत सर्वांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून टीसीएसने ओईएमना धोरणात्मक सहयोग प्रदान केला आहे, आयसीई ते इव्ही परिवर्तन प्रवासामध्ये मदत केली आहे. संपूर्ण जगभरात रस्त्यांवर धावत असलेल्या ५००,००० पेक्षा जास्त इव्हीना बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम सॉफ्टवेयर तैनात करण्यात आणि ओईएमसाठी ७५ पेक्षा जास्त देशांमध्ये इव्ही चार्जिंग पायाभूत सोयीसुविधा स्थापन करण्यात मदत केली आहे.
