लक्ष्मी डेंटल लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 13 जानेवारी 2025 पासून सुरू
- प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 407 रुपये ते 428 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
- बोली/ऑफर सोमवार 13 जानेवारी 2025 रोजी खुली होईल आणि बुधवार 15 जानेवारी 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदारांची बोली खुली आणि बंद होण्याचा दिनांक शुक्रवार 10 जानेवारी 2025 असणार आहे.
- बोली किमान 33 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 33 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
- RHP लिंक: https://www.laxmidentallimited.com/public/investors/offer_documents/rhp/Project-Lotus-RHP(withfinancials).pdf
मुंबई : लक्ष्मी डेंटल लिमिटेड (“LDL” or “The Company”) सोमवार 13 जानेवारी 2025 रोजी इक्विटी शेअरची प्राथमिक समभाग विक्री करण्यासाठी बोली/ऑफर सुरू करत आहे.
प्रति इक्विटी शेअरसाठी (“प्राईस बॅन्ड”) 407 रुपये ते 428 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 33 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 33 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“बिड लॉट”). इक्विटी शेअर्सच्या एकूण ऑफर साईजमध्ये विक्री समभागधारकांद्वारे (प्रति शेअर 2 चे दर्शनी मूल्य) 1,380 दशलक्ष रु. [138 कोटी रु.] पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 13,085,467 [1.31 लाख इक्विटी शेअर्स] पर्यंतची विक्रीसाठीची ऑफर (“ऑफर फॉर सेल”) समाविष्ट आहे. (“एकूण ऑफर साईज”)
कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा वापर खालीलप्रमाणे करणार आहे:
(i) कंपनीने घेतलेल्या ठराविक प्रलंबित कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/प्री-पेमेंट करण्यासाठी 229.84 दशलक्ष रु. [22.98 कोटी रु.] खर्च केला जाईल;
(ii) ठराविक उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करून, ठराविक प्रलंबित कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/प्री-पेमेंट करण्यासाठी 46 दशलक्ष रु. [4.60 कोटी रु] खर्च केला जाईल;
(iii) कंपनीसाठी नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी भांडवली खर्च आवश्यकतांसाठी 435.07 दशलक्ष रु. [43.51 कोटी रु.] खर्च केला जाईल;
(iv) उपकंपनी Bizdent Devices Private Limited मध्ये नवीन यंत्रसामग्री खरेदीसाठी भांडवली खर्च आवश्यकतांसाठी 250.04 दशलक्ष रु. [25.00 कोटी रु. ] गुंतवणूक केली जाईल आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरली जाईल.
विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये राजेश व्रजलाल खाखर यांच्याकडून 196,604 पर्यंतचे इक्विटी शेअर्स,
समीर कमलेश मर्चंट यांच्याकडून 434,598 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “प्रवर्तक विक्री समभागधारक”); OrbiMed Asia II Mauritius Limited यांच्याकडून 11,614,267 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”), जिग्ना राजेश खाखर यांच्याकडून 239,838 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, हसमुख व्रजालाल खाखर यांच्याकडून 150,040 पर्यंतचे इक्विटी शेअर्स,
अमरिश महेंद्रभाई देसाई यांच्याकडून 150,040 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पराग जमनादास भीमजियानी यांच्याकडून 150,040 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि कुणाल कमलेश मर्चंट यांच्याकडून 150,040 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (सर्व मिळून “इतर विक्री समभागधारक”) समाविष्ट आहेत:
प्रमुख गुंतवणूकदारांची बोली खुली आणि बंद होण्याचा दिनांक शुक्रवार 10 जानेवारी 2025 असणार आहे. बोली/ऑफर सोमवार 13 जानेवारी 2025 रोजी खुली होईल आणि बुधवार 15 जानेवारी 2025 रोजी बंद होईल. (The “Bid Details”)
हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या 07 जानेवारी 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर करण्यात येत असून गुजरातमधील अहमदाबाद येथे कंपनी नोंदणी कार्यालय (“ROC”) येथे दाखल करण्यात आला आहे.
या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेस BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनीला इक्विटी शेअर्सच्या लिस्टिंगसाठी बीएसई आणि एनएसईकडून 30 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पत्रांद्वारे ‘तत्त्वतः’ मंजुरी मिळाली आहे. ऑफरच्या उद्देशासाठी नियुक्त स्टॉक एक्सचेंज हे BSE असेल.
नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. (The “BRLMs”).
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.
सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस (रेग्युलेशन) नियम 1957 च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार (the “SCRR”) आणि “SEBI ICDR Regulations” नियम 31 च्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(2) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 75 % पेक्षा कमी नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”).
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी (अ) एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब्) दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 10% पेक्षा जास्त नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.
प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशीलासाठी 544 पानावर सुरू होणारी “ऑफर प्रोस्युजर” बघा.
