वाल्मीक कराडला कोठडीत हवा पूर्णवेळ मदतनीस
न्यायालयाकडे वाढत्या मागण्यांची यादी
बीड: आपल्याला एक गंभीर रोग असून त्यासाठी आवश्यक असलेले यंत्र कोठडीत आपल्याला उपलब्ध करून देण्यात यावे त्याचप्रमाणे हे यंत्र चालवण्यासाठी पूर्णवेळ मदतनीस मिळावा, अशी विनंती पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड Valmik Karad यांनी केली आहे.
बीडमधील खंडणी प्रकरणात कराड याच्यावर गुन्हा दाखल आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे.
अनेक दिवस फरार राहिल्यानंतर कराड याने पुणे येथील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा श्वसनाचा विकार आहे. त्यामुळे विशेषतः रात्री झोपताना ऑक्सिजनचे मशीन लावावे लागते. हे मशीन आपल्याला कोठडी उपलब्ध करून द्यावे आणि ते चालवण्यासाठी पूर्णवेळ मदतनीस द्यावा, अशी मागणी कराड याने न्यायालयाकडे केली आहे. यापूर्वी देखील त्याने कोठडीत आपल्याला जेवणात खिचडी मिळावी, अशी मागणी केली होती.
