Monday, June 8, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

२३वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशनसांस्कृतिक कार्य विभागमहाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरीमुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ यंदा १३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत पीव्हीआरपॅव्हिलियन मॉलआयनॉक्स – बंडगार्डन  आणि सिनेपोलीस-औंध येथे ११ स्क्रीनस मध्ये आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपट महोत्सवात जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभाग यांमध्ये सुमारे १५० हून अधिक देशी विदेशी चित्रपट रसिक प्रेक्षकांना बघता येतील.  शोमैन राज कपूर यांची १००वी  जयंती ही या वर्षीची थीम असणार आहे. सर्वांसाठी  कॅटलॉग फी ८००/- असून याची नाव नोंदणी www.piffindia.com  यावर दि. १५ जानेवारी पासून सुरु होत आहेअशी माहिती ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषेदत दिली.

याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखातेविश्वस्त डॉ. मोहन आगाशेविश्वस्त डॉ. सतीश आळेकरचित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवेउपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म)उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) उपस्थित होते.  

जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात यंदा १०७ देशांमधील १०५० हून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक मंडळाने हे सर्व चित्रपट बघून त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. अंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत अंतिम फेरीतील हे १४ चित्रपट बघून सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपट निवडला जाईल. त्यास ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ – १० लाख रुपये देऊन समारोप कार्यक्रमात गौरवले जाईल.

यंदा जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात निवडण्यात आलेल्या १४ चित्रपटांची यादी पुढील प्रमाणे :

१.       डार्केस्ट मीरियमदिग्दर्शक – नाओमी जयेकॅनडा

२.       ऑन द इन्वेंशन ऑफ स्पीशीज़दिग्दर्शक – तानिया हरमीडइक्वाडोरक्यूबा

३.       टू  अ  लँड  अननोनदिग्दर्शक – मह्दी फ्लेफेलयुनायटेड किंगडमफ्रान्सजर्मनीनेदरलँडग्रीसकतारसौदी अरेबियापॅलेस्टाईन

४.       ग्रैंड टूरदिग्दर्शक – मिगुएल गोम्सपोर्तुगालइटलीफ्रान्स

५.       अरमंडदिग्दर्शक – हलफदान उल्लमांन तोंडेलनॉर्वेनेदरलँडजर्मनीस्वीडन

६.       सेक्सदिग्दर्शक – डॅग जोहान  हाउगेरूडनॉर्वे 

७.       इलेक्ट्रिक फील्ड्सदिग्दर्शक – लिसा गेर्ट्सचस्वित्झर्लंड

८.       अंडर द वोल्केनोदिग्दर्शक – डेमियन कोकूरपोलंड 

९.       ए ट्रॉवेलर्स नीड्सदिग्दर्शक – हाँग सांगसू दक्षिण कोरिया

१०.     ब्लैक टीदिग्दर्शक – अब्दर्रहमान सिसाकोफ्रान्समॉरिटानियालक्झेंबर्गतैवानआयव्हरी कोस्ट

११.      सम रेन मस्ट फॉलदिग्दर्शक – यांग क्यूचीनअमेरिकाफ्रान्ससिंगापूर

१२.     एप्रिलदिग्दर्शक – डी कुलुंबेगश्वील,  फ्रान्सइटलीजॉर्जिया

१३.     थ्री किलोमीटर्स टू  द एंड ऑफ द वर्ल्ड्सदिग्दर्शक – एमानुअल पर्वू रोमानिया

१४.     इन रिट्रीटदिग्दर्शक – मैसम अलीइंडिया 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading