Monday, June 8, 2026
BusinessLatest News

NSE ने  2024 मध्ये आशियातील सर्वाधिक आयपीओ आणि जागतिक पातळीवर प्राथमिक बाजारातून सर्वाधिक इक्विटी भांडवल उभारण्याचा विक्रम साधला

भारतीय राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) 2024 कॅलेंडर वर्षात मुख्य बाजारातील (90) आणि लघु व मध्यम उद्योग (SME) विभागातील (178) एकूण 268 यशस्वी IPOs सादर करून ₹1.67 लाख कोटी रुपयांची भांडवल उभारणी केल्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

कोणत्याही कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक आयपीओचा विक्रम यंदा झाला आहे. यातून भारताच्या भांडवली बाजारांवर गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास अधोरेखित होतो.

2024 कॅलेंडर वर्षात जागतिक स्तरावर एकूण 1,145 IPOs झाले, जे 2023 च्या 1,271 IPOs च्या तुलनेत कमी आहेत. मात्र, भारताने या यादीत आघाडी घेतली असून एनएसईने 268 कंपन्यांना आयपीओद्वारे भांडवल उभारण्यासाठी मदत केली, ज्यातून सुमारे ₹ 1.67 लाख कोटी ($19.5 अब्ज) जमा झाले. यामध्ये भारतातील सर्वात मोठा IPO आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा आयपीओ – Hyundai Motor India Ltd. च्या $3.3 अब्जच्या आयपीओचा समावेश आहे. यातील कंपन्या मुख्य बाजारातील (Main Board) आणि लघु व मध्यम उद्योग (SME) सूचीबद्ध झाल्या आहेत. मुख्य बाजारात 90 कंपन्या (REITs, InVITs, आणि FPOs वगळून) सूचीबद्ध झाल्या, ज्यातून सुमारे ₹1.59 लाख कोटी ($18.57 अब्ज) उभारले गेले. तर 178 एसएमईंनी एकत्रितपणे सुमारे ₹7,349 कोटी ($0.86 अब्ज) जमा केले.

ही वाढती सक्रियता गुंतवणूकदारांचा प्रचंड विश्वास आणि कंपन्यांकडून त्यांच्या वाढीच्या उद्दिष्टांसाठी सार्वजनिक भांडवल उभारण्याचा सकारात्मक कल यांचे उत्कृष्ट प्रतीक आहे.

एनएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी (सीबीडीओ) श्रीराम कृष्णन यांनी सांगितले की, “या कॅलेंडर वर्षातील विक्रमी आयपीओंची संख्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिरता आणि क्षमता अधोरेखित करते. विविध क्षेत्रांतील कंपन्या त्यांच्या वाढीच्या धोरणांना समर्थन देण्यासाठी सार्वजनिक बाजारांचे महत्त्व ओळखत आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, एनएसईने एकट्याने जपान (Japan Exchange Group), हाँगकाँग (Hong Kong Stock Exchange), आणि चीन (Shanghai Stock Exchange) यांच्या एकत्रित आयपीओंच्या संख्येपेक्षा जास्त आयपीओ यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.”

याशिवाय, एनएसईने 2024 कॅलेंडर वर्षात आयपीओंद्वारे $17.3 अब्ज इतके सर्वाधिक भांडवल उभारले आहे, जे एनवायएसई ($15.9 अब्ज) आणि शांघाय स्टॉक एक्सचेंज ($8.8 अब्ज) सारख्या जागतिक स्टॉक एक्सचेंजच्या तुलनेत अधिक आहे.”

खालील तक्ता एनएसईच्या आशियातील इतर प्रमुख एक्सचेंज्सच्या तुलनेतील प्रभावी कामगिरीचे चित्र स्पष्ट करतो, ज्यात जपान (Japan Exchange Group), हाँगकाँग (Hong Kong Stock Exchange), आणि चीन (Shanghai Stock Exchange) यांचा समावेश आहे. याशिवाय, हा डेटा शीर्ष 5 स्टॉक एक्सचेंज्सद्वारे आयपीओंच्या माध्यमातून उभारलेल्या निधीचा ($ अब्ज) तपशील देखील दाखवतो.

हा आकडा दर्शवतो की भारताच्या एनएसईने यादीकरणाच्या संख्येत आणि आयपीओंमधून उभारलेल्या निधीच्या दृष्टीने इतर प्रमुख जागतिक एक्सचेंज्सच्या तुलनेत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.

देश एक्स्चेंज आयपीओंची संख्या
भारत राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) 268
जपान जपान एक्सचेंज ग्रुप

(Combination of Six exchanges)

93
हाँगकाँग हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज 66
चीन शांघाय स्टॉक एक्सचेंज 101
देश एक्स्चेंज एकूण उभारलेला निधी ($अब्ज) (जवळपास)
भारत राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) 19.5*
यूएसए नॅस्डॅक 16.5
यूएसए एनवायएसई 15.9
हाँगकाँग हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज 10.4
चीन शांघाय स्टॉक एक्सचेंज 8.8

 

*संपूर्ण डेटा 31 डिसेंबर 2024 रोजीच्या RBI संदर्भ दरानुसार 85.62 USD-INR वर आधारित आहे.

2025 सुरू झालेले आहे. या वर्षातही एनएसई आपल्या प्लॅटफॉर्मला अधिक भांडवल उभारणीसाठी आणि व्यवसायांच्या विविध वाढीच्या टप्प्यांमध्ये त्यांना सहाय्य करण्यासाठी अधिक मजबूत करण्यास वचनबद्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading