Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

वाल्मीक कराड यांचे नार्को टेस्ट करा… – संभाजी ब्रिगेड

पुणे : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निर्गुण पणे केलेली आहे. खंडणीखोर वाल्मीक कराड आणि त्याच्या सहकार्याने ठरवून केलेली हत्या आहे. ती हत्या बीड जिल्ह्याच्या मंत्र्यांकडून झालेले आहे. सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा माहिती गेल्या दहा वर्षात बीड जिल्ह्यात शेकडो हत्या झाल्या त्याचा मारेकरी कोण आहे? त्याचं नाव वाल्मीक कराड द्वारे धनंजय मुंडे हेच आहे. आता महाराष्ट्र शांत बसणार नाही. सरकार सीआयडी आणि पोलीस प्रशासन यांच्या हातावर तुरी देऊन गेली 20 दिवस वाल्मीक कराड फरार असतो? धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाल्मीक कराड पुण्यामध्ये सरेंडर होतात याचा अर्थ त्यांना इकडे तिकडे पळवलं कुणी? वाल्मीक कराड यांचा मास्टर माईंड कोण? वाल्मीक कराड यांना पाठीशी घालतोय कोण? बीड जिल्ह्यातील शेकडो हत्या कोणी केल्या? याचा तपास झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

म्हणून वाल्मीक कराड यांची नार्को टेस्ट करा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. ही मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading