रस्ते अपघात रोखण्यासाठी मोटार ड्रायव्हींग स्कूल संचालकांची भुमिका महत्वाची – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
पुणे : वाहन चालकांनी जबाबदारीचे वागले पाहिजे. वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहनांचा गरजेनुसार वापर करावा.वाहन प्रदूषण होणार नाही यांची काळजी घेऊन वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहन चालवावे,या साठी मोटार ड्रायव्हींग स्कूल संचालकांनी कसोशिने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन परिवहन राज्य मंत्री श्रीमती.माधुरी मिसाळ यांनी केले.
परिवहन राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माधुरी मिसाळ, यांची सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या वतीने माधुरी मिसाळ, यांचा अध्यक्ष विजयकुमार दुग़्गल कार्याध्यक्ष विठ्ठल मेहता यांनी संघटनेच्यावतीने गोळीबार मैदान,चौक शंकर शेठ रोड, पुणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात केला.
या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी महेश शिळीमकर, कृष्णा दाभाडे,एकनाथ ढोले ई.मान्यवर उपस्थित होते.
