Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष मुलांच्या संस्थेला वैद्यकीय वस्तूंची भेट

पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रंथालय सेलच्या वतीने प्रा फौंडेशन या विशेष मुलांच्या संस्थेला प्रथमोपचार साहित्य आणि इतर वैद्यकीय वस्तू भेट देण्यात आल्या.

गेली पाच वर्षे सेलच्या अध्यक्षा प्राजक्ता जाधव या संस्थेसाठी वैद्यकीय वस्तूंची भेट आणि विशेष मुलांसाठी खाऊ वाटप असा उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल प्रा फौंडेशनच्या अध्यक्षा प्राजक्ता कोळपकर यांनी कौतुक केले.

प्रा फौंडेशनमध्ये वय वर्षे १५ते ६० पर्यंतच्या महिला आणि पुरुष मिळून ४०जण आहेत. या सर्वांच्या कुटुंबीयांना दिलासा देणे, आधार देणे, त्यांच्याशी संवाद साधणे असे कार्य केले जाते.

वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला अध्यक्षा स्वातीताई पोकळे, पर्वती विधानसभा अध्यक्ष संजय वावळ, पर्वती विधानसभा महिला विभाग अध्यक्षा विद्याताई ताकवले, माहिती अधिकार विभागाचे अध्यक्ष विनय पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading