संशोधक विद्यार्थी-मार्गदर्शक यानी समाजोपयोगी संशोधनाचे धोरण ठेवावे.’ -प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर
शिरूर : नव्याने होणाऱ्या बदलांशी सुसंवादी राहून आपले संशोधन हे समाजोपयोगी व्हावे म्हणून गुणात्मक दर्जाकडे अधिक लक्ष संशोधक विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकानी देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा तर्फे येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात पुणे ग्रामीण ग्रामीण विभागातील संशोधन केंद्र प्रमुख, समन्वयक,मार्गदर्शक व पीएच. डी. संबंधित कामकाज पहाणारे कर्मचारी यांची संयुक्त कार्यशाळा आयोजित केली होती. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. यशोधर मिठारे,डाॕ. प्रभाकर देसाई, डॉ.विजय खरे यांनी संशोधनासंदर्भात विशेष मार्गदर्शन केले. सुरवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी.मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ‘विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रात प्रवेशापासून येणाऱ्या अडचणी सांगून संशोधनाचा दर्जा संभाळून पदवी प्राप्त करताना विद्यार्थ्यांना व केंद्राना येणाऱ्या समस्यांचे कथन केले, संस्थासचिव प्राचार्य नंदकुमार निकम यांनी नव्या बदलांशी सुसंवादी राहून नव्या गोष्टी अवगत होण्यासाठी अशा कार्शाळांची उपयुक्तता सांगितली.
प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट करताना ‘संशोधक विद्यार्थ्यांनी गुणवत्तेशी तडजोड न करता समाजातील विविध घटकांना उपयुक्त ठरणारे,देशाला,जगाला उपयुक्त ठरेल अशा संशोधनाच्या आवश्यकतेचे महत्त्व असल्याचे सांगितले.संशोधनात गुणवत्ता – पारदर्शकता हवी पण सरकारी धोरणे ठरवताना उपयुक्त ठरेल अशा संशोधनाची आवश्यकता का आहे या विषयी मार्गदर्शन केले. दरम्यान महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील संशोधन उपक्रमांची माहिती करून घेतली.
माजी प्र-कुलगुरू डॉ.उमराणी म्हणाले की,”आजच्या काळात सक्षमलोकांनाच वाटते की आपण कुठेतरी कमी पडत आहोत,आपल्यावर अन्याय होत आहे. ही मानसिकता बदलणे फारच आवश्यक आहे. राष्ट्रीय विकासात योगदान सांगणारे, मूल्य व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न करणारे संशोधन असावे. ते मार्मिक व मी मौलिक करत असतानाच संशोधन संस्कृती विकसित झाली पाहिजे. संशोधकानेही बदलाला सुसंगत रहावे,विचारांचे संप्रेक्षण जेथे होते ते विद्यापीठ असते. त्यांना सशक्त,परिवर्तनशील विचारांसाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निर्माण करावा लागेल,त्यांना संशोधन करताना आत्मनिर्भर करणे,शास्त्रीय पद्धतीचा वापर करताना विविध उपयुक्तता व गुणवत्ता यावर सर्व घटकांनी भर देणे आवश्यक आहे ‘असे मत व्यक्त केले. दोन सत्रात आयोजित केलेल्या या कार्यशाळेत उपकुलसचिव डॉ, मुंजाजी रासवे यांनी विविध समस्या व प्रश्न यांच्यासंदर्भात मार्गदर्शन व शंकाचे निरसन केले.आॕनलाईन प्रणाली विषयी श्री.काळे व श्री.गोपाळे यांनी माहिती दिली. या कार्यशाळेच्या संयोजनात डॉ. घनगावकर व महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सहभाग घेतला.विद्यापीठातर्फे मा.सुनिता हजारे यांनी आभार मानले.डॉ.ईश्वर पवार व डॉ. क्रांती पैठणकर यांनी सुत्रसंचालन केले. या संशोधन विषयक कार्यशाळेला पुणे ग्रामीण विभागातून सुमारे १५० प्रतिनिधी उपस्थित होते.
