Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

मानवी तिरंगी ध्वजातून सैनिकांना मानवंदना देत ध्वजदिन साजरा

पुणे : पारतंत्र्याच्या काळात ध्वज हातात धरणे, वंदे मातरम् घोषणा देणे, हे कठीण होते. पण हातातील ध्वज जमिनीवर पडू न देण्यासाठी व त्याचे प्राणपणाने रक्षण करण्यासाठी देशभक्तांनी प्राणांची बाजी लावली. त्यामुळे भारतीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या ध्वजाला मानवंदना देत आजी-माजी सैनिकांच्या कार्याला सलाम करीत मानवी तिरंगी ध्वज साकारुन ध्वजदिन साजरा करण्यात आला. तब्बल २५० विद्यार्थ्यांनी मानवी तिरंगी ध्वज साकारुन आगळीवेगळी मानवंदना दिली.

न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस तर्फे साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, देशाच्या सीमांचे व स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करणा-या सैनिकांप्रती समाजाचे काही ॠण आहे. तसेच नागरी जीवनात उद््भविणा-या समस्या, वादळे यांसह नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतकार्य करणा-या सैनिकांचेही आपल्यावर ॠण आहे. त्यामुळे त्यांना सलाम करण्याची संधी ध्वजदिनाच्या निमित्ताने साधत विद्यार्थ्यांनी हा ध्वज साकारला. तसेच लष्कराच्या तिन्ही दलांचे ध्वज देखील यावेळी साकारण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading