Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

भारतीय संविधान सभेतील व स्वातंत्रलढ्यातील महिलांच्या कर्तृत्वाचा जागर

पुणे  : भारत देश घडवण्यात व देशाचं संविधान बनविण्यात महिलांचेही मोलाचे योगदान आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या आणि सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या तसेच संविधान समितीत सहभागी असणार्‍या पंधरा महिलांचा इतिहास व त्यांचे योगदान लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी, त्यांच्या कार्याचा उजाळा देण्यासाठी पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. निमित्त होते महिला जागर समितीद्वारे आयोजित ‘मेरी रातें, मेरी सडके’ उपक्रमाच्या सहाव्या रात्रीचे. ही रात्र शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 रात्री 8 वाजता छ. संभाजी गार्डन येथील फुटपाथवर साजरी करण्यात आली. उपक्रमाची सुरूवात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात विरांगणांच्या कहाण्यांच्या पोस्टर्स लावून, त्यांच्या कहाण्या सांगून साजरी केली गेली.

महिला जागर समितीच्या संयोजकापैकी स्मिता शेट्टी,संगीता पाटणे, असुंता पारधे, शोभा करंडे, जीविका, रंजना पासलकर, वर्षा सपकाळांनी स्वातंत्र्यलढ्यातील व संविधान सभेतील विविध अज्ञात विरांगणांच्याबाबत माहिती सांगितली. मुक्ताई फाऊंडेशनचे इंदिरा बागवे, अनुसया फाऊंडेशनचे स्वाती पोकळे, रविंद्र केअर फाऊंडेशनचे प्राजक्ता जाधव यांनी मनोगत व्यक्त केली प्रास्ताविक श्रद्धा रे रा यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading