तनिष्कची पेशकश ‘रिवाह X तरुण तहिलियानी’ची द्वितीय आवृत्ती: नवरीच्या शानदार आभूषणांचा सोहळा
सहयोगाच्या शुभारंभाला मिळालेल्या भरघोस यशानंतर, तनिष्कचा एक्सक्लुसिव्ह वेडिंग सब-ब्रँड रिवाहने सुप्रसिद्ध डिझायनर तरुण ताहिलियानी यांच्यासह विशेष भागीदारीमध्ये ‘रिवाह X तरुण ताहिलियानी’ च्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. हे नवीन कलेक्शन आधुनिक भारतीय नवरी म्हणजेच पारंपरिक मूल्ये आणि आधुनिकता यांना जोडणारी सूत्रधार, तिच्या आवडीनिवडीप्रमाणे बनवण्यात आले आहे. हे डिझाईन तिची नवी आवड आणि प्राथमिकतांना अनुरूप आहे, इतकेच नव्हे तर प्रगतिशील भारतीय नवरीचे कालातीत सौंदर्य आणि अनोखेपणाचा सन्मान करते.
तनिष्कची नाजूक कारीगरी आणि तरुण ताहिलियानी यांच्या कला कौशल्याने या कलेक्शनमध्ये वारसा आणि आधुनिकता यांचा मिलाप घडवून आणला आहे. सौंदर्य, समृद्धी आणि पवित्र सुरुवात यांचे प्रतीक फूलचादर आणि फेमिनिटी, सांस्कृतिक शान यांचे प्रतीक ड्रेप स्टोरी या दोन थीमपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये सोन्यावर नाजूक कलाकारी करण्यात आली आहे. लहानशी कळी ते पूर्ण फुललेले फुल अशी वेगवेगळी फ्लोरल मोटिव्ह आणि तरुण ताहिलियानी यांच्या ड्रेप्सना फ्लुइड पॅटर्नमध्ये नवीन पद्धतीने रचण्यात आले आहे. यातून साकार झाले आहे एक शानदार कलेक्शन, ज्यामध्ये आधुनिक सिल्हट आणि पारंपरिक कला यांचा मिलाप आहे, जे प्रत्येक वेडिंग सीझनमध्ये आधुनिक नवरीला कालातीत शान प्रदान करेल.
या दागिन्यांमध्ये नवरीच्या नाजूक वाटचालीला अतिशय शानदार पद्धतीने कॅप्चर केले आहे. प्रत्येक दागिना आधुनिक सूत्रधार नवरीची व्यक्तिगत आवड दर्शवतो. यामध्ये अनेक पर्याय सादर केले गेले आहेत, हे शानदार कलेक्शन कलात्मक नैपुण्ये आणि कालातीत डिझाईनचा मिलाप आहे. ग्लास कुंदन व सोन्यामध्ये हे दागिने खूप कौशल्याने तयार करण्यात आले आहेत. भारतीय लग्नसमारंभांच्या सन्मानार्थ प्रस्तुत करण्यात आलेले हे कलेक्शन आधुनिक भारतीय नवरीची आवड दर्शवते, या नवरीमध्ये आत्मविश्वास आहे, पण ती तिच्या परंपरांशी जोडून आहे. आराम आणि स्टाईल यांना एकत्र जोडणे तिला आवडते. प्रत्येक दागिना प्रत्येक प्रसंगाला शानदार आणि संस्मरणीय बनवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ग्रँड सेलिब्रेशन असो किंवा हळद, मेहंदी, संगीत, कॉकटेल अशी फंक्शन असोत, हे कलेक्शन लग्नासाठी उत्तम आहे. तरुण ताहिलियानी यांच्या प्रभावामुळे या कलेक्शनमध्ये एम्ब्रॉयडरीचा आनंद साजरा करण्यात आला आहे. अनोखेपण आणि सांस्कृतिक सघनता ज्यांना हवी असते अशा नवरीसाठी हे लक्झरियस तरीही शानदार पर्याय आहेत. गुलुबंद, हेरम, पेंडंट, हाथफूल, रिंग्स, मांग टीका अशा अनेक प्रकारच्या दागिन्यांची ८० पेक्षा जास्त डिझाईन इथे आहेत. लूक कोणताही असो, तो परिपूर्ण बनवणारे आश्चर्यजनक दागिने इथे आहेत.
रिवाह X तरुण ताहिलियानीच्या द्वितीय आवृत्तीच्या लॉन्च प्रसंगी टायटन कंपनी लिमिटेडच्या चीफ डिझाईन ऑफिसर श्रीमती रेवती कांत यांनी सांगितले, “आमच्या पहिल्या सहयोगाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता रिवाह X तरुण ताहिलियानी वेडिंग कलेक्शनची द्वितीय आवृत्ती प्रस्तुत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे कलेक्शन आम्ही आधुनिक भारतीय नवरीसाठी तयार केले आहे. तरुण ताहिलियानी यांच्या सिग्नेचर एम्ब्रॉयडरीपासून प्रेरणा घेऊन, कालातीत सौंदर्याला आधुनिक आवडीनिवडीशी जोडून हे कलेक्शन तयार केले गेले आहे. कलेक्शनमधील प्रत्येक दागिना अतिशय बारकाईने लक्ष देऊन तयार केला आहे. यामध्ये आमच्या अनोख्या कारीगरी एम्ब्रॉयडरीला अलंकारांचे रूप देण्यात आले आहे. नवरीचा खास दिवस अजून शानदार करण्यासाठी आम्ही करत असलेले प्रयत्न यामध्ये दिसून येतात. हे दागिने त्यांच्या प्रगतिशील तरीही परंपरेशी जोडून असलेल्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकतात. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे रिवाहसाठी सर्वात मोठे वेडिंग सीझनचे महिने आहेत, यावर्षी लग्नांचे दिवस मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट जास्त आहेत. भारतीय लग्ने आणि फंक्शन्ससाठी सर्वात आवडीचे ज्वेलरी म्हणून रिवाहचे स्थान अजून मजबूत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमची वेगवेगळी डिझाइन्स रिवाहची भारतीय ज्वेलरी मार्केटमधील उत्कृष्टता दर्शवतात.”
तरुण ताहिलियानी यांनी सांगितले, “तनिष्क रिवाहसोबत माझ्या कलेक्शनची द्वितीय आवृत्ती आधुनिक नवरीसाठी तयार केली आहे. यामध्ये कालातीत सौंदर्य आणि आधुनिक भारतीय एस्थेटिक्स यांची सांगड घातली गेली आहे. यावर्षी आम्ही या कलेक्शनमध्ये सोने आणि आंतरिक मूल्याच्या तंत्रावर फोकस करण्यात आले आहे. हे कलेक्शन तरुण ताहिलियानी अर्काइवल एम्ब्रॉयडरीने प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे. या गोल्ड ज्वेलरी कलेक्शनमध्ये परंपरा आणि आधुनिक सौंदर्य दृष्टी यांचा मिलाप केला आहे, आमच्या डिझाईन इसेन्सना कॅप्चर करणारी कारीगरी यामध्ये आहे. आमचे दोन कोर डिझाईन पिलर – द आयकॉनिक ड्रेपपासून प्रेरित होऊन यामध्ये शानदार लेयर दर्शवले गेले आहेत, फूलचादर, यामध्ये नाजूक फ्लोरल मोटिफ आहेत, हे दागिने फॅब्रिक कलात्मकतेला सोन्यामध्ये परिवर्तित करण्याचे कौशल्य दर्शवतात. हे कलेक्शन रंगांसोबत किंवा प्लेन्ससोबत परिधान करा, आपल्या आवडीप्रमाणे साजशृंगार करा आणि आयुष्य आनंदात साजरे करा.”
