Wednesday, April 1, 2026
BusinessLatest News

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेडचा आयपीओ शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024 रोजी खुला होणार

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेडचा आयपीओ शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024 रोजी खुला होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांना त्याच्या आधी एक कामकाजाचा दिवस म्हणजेच गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 रोजी बोली लावता येईल. बोली/ऑफर मंगळवार, 3 डिसेंबर, 2024 रोजी बंद होईल.

या ऑफरसाठी प्राईस बँड दर इक्विटी समभागासाठी 420 रुपये ते 441 रुपये निश्चित करण्यात आला आहे. बोली कमीत कमी 34 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास 34 च्या पटीत बोली लावावी लागेल.

आयपीओमध्ये 19,189,330 पर्यंत विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा समावेश आहे, यामध्ये डॉ सोमनाथ चॅटर्जी यांच्याकडून 2,132,148 पर्यंत, रितू मित्तल यांच्याकडून 2,132,148 पर्यंत, सतीश कुमार वर्मा यांच्याकडून 2,132,148 पर्यंत, ऑर्बिमेड एशिया II मॉरिशस लिमिटेडकडून 10,660,737 पर्यंत, मुन्ना लाल केजरीवाल यांच्याकडून 799,556 पर्यंत आणि संतोष कुमार केजरीवाल यांच्याकडून 1,332,593 पर्यंत विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा समावेश आहे.

कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading