‘सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड’तर्फे ‘सेबी’कडे ₹1150 कोटीपर्यंतच्या ‘आयपीओ’साठी डीआरएचपी दाखल
भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या व मॉड्यूल उत्पादन कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ‘सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड’ने भारतातील सौर ऊर्जा बाजारपेठेत एक प्रमुख खेळाडू म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे (स्रोत: क्रिसिलचा अहवाल). या कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) या बाजार नियामक संस्थेकडे आपला ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (“डीआरएचपी”) दाखल केला आहे. कंपनीने प्राथमिक समभाग विक्रीच्या माध्यमातून प्रत्येकी ₹2 चे दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स ऑफर करून ₹11,500 दशलक्ष (₹1150 कोटी) या रकमेपर्यंतचा निधी उभारण्याची योजना आखली आहे.
या ऑफरमध्ये ₹8500 दशलक्ष (₹850 कोटी) या रकमेपर्यंतच्या नवीन इक्विटी शेअर्सचा (“फ्रेश इश्यू”) आणि ₹3000 दशलक्ष (₹300 कोटी) या रकमेपर्यंतच्या शेअरधारकांकडील इक्विटी शेअर्सचा (“ऑफर फॉर सेल”) समावेश आहे
‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’द्वारे ऑफर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”) येथे सूचीबद्ध (“लिस्टिंग डिटेल्स”) करण्याचा प्रस्ताव आहे.
डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड, ॲम्बिट प्रायव्हेट लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड हे या इश्यूचे ‘बुक रनिंग लीड मॅनेजर’ (“बीआरएलएम”) आहेत.
