Monday, June 8, 2026
Latest NewsSports

राजस्थान रॉयल्सचा सलग तिसरा विजय 

इकोल टी-२० करंडक – साव्या गजराज सामनावीर
पुणे – साव्या गजराजच्या फिरकीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स अकादमी संघाने अष्टपैलू स्पोर्ट्स संघाला २ गडी राखून पराभूत करताना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इकोल टी-२० करंडक स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
प्रथम फलंदाजी करताना अष्टपैलू संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली. सागर पवारने ३६ चेंडूत २ चौकार व ५ षटकार लागवताना ५५ धावांची खेळी केली. त्याला यश जगदाळेने ३६ तर साहिल अभंगने नाबाद १६ धावा करताना सुरेख साथ दिली. साव्या गजराजने २८ धावांच्या मोबदल्यात ४ गडी बाद केले. निलय नेवासकरने २ तर सुनील यादवने १ गडी बाद केला.
राजस्थान रॉयल्स अकादमी संघाने १९.४ षटकांत ८ बाद १५७ धावा करताना विजय साकारला. स्वप्नील फुलपगारने २२ चेंडूत ४० तर अद्वय सिधयेने २७ चेंडूत ३० धावांची खेळी केली. वैभव अगमने ३० चेंडूत ३ चौकार व ३ षटकार लागवताना ४३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. अमित राठोडने . तर अश्कन काझी व साहिल अभंग यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. अष्टपैलू खेळासाठी साव्या गजराजला (१० धावा, ४ बळी) सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
अष्टपैलू स्पोर्ट्स : २० षटकांत ७ बाद १५३ : सागर पवार ५५ (२ चौकार, ५ षटकार ), यश जगदाळे ३६ (३ चौकार, २ षटकार), साहिल अभंग नाबाद १६ (१ चौकार, १ षटकार), रोहित कारंजकर ११ (१ षटकार), साव्या गजराज ४-२८, निलय नेवासकर २-९, सुनील यादव १-१७ पराभूत वि. राजस्थान रॉयल्स अकादमी : १९.४ षटकांत ८ बाद १५७ : स्वप्नील फुलपगार ४० (६ चौकार, १ षटकार), वैभव अगम ४३ (३ चौकार, ३ षटकार), अद्वय सिधये ३० (१ चौकार, १ षटकार), अमित राठोड ३-२९, अश्कन काझी २-१६, साहिल अभंग २-२९.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading