मनोज जरांगेंच्या हिटलिस्टवर महायुतीचे ‘हे’ आमदार
दरम्यान, कळमनुरीमध्ये शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर, औसामधून भाजप आमदार अभिमन्यू पवार, भोकरदनमधून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे, जिंतुर च्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर आदी महायुतीतील दिग्गज चेहरे मनोज जरांगे पाटील यांच्या हिटलिस्टवर असल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे बदनापूरमधून पाठिंबा देण्याची घोषणा सुद्धा पाटील यांनी केली आहे.
या ठिकाणी देणार उमेदवार
1) केज,(राखीव बीड जिल्हा)
2) परतूर, (जालना जिल्हा)
3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
4) बीड, (बीड जिल्हा)
5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)
6) पाथरी,( परभणी जिल्हा)
7) हदगाव, (जिल्हा नांदेड)
या ठिकाणचे उमेदवार पडणार
1) भोकरदन, (जालना जिल्हा)
2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)
3) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)
4) गंगाखेड, (परभणी जिल्हा)
5) जिंतूर, (परभणी जिल्हा)
6) औसा-(लातूर जिल्हा)
या ठिकाणी पाठिंबा देणार
1) बदनापूर राखीव जालना जिल्हा
2) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
