Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कॉंग्रेसचे लाडकी बहिण योजनेविरुद्ध षडयंत्र! चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

 

  • अपमान करणाऱ्यांना महिलाच धडा शिकवतील

कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्रातील लाडकी बहिण, शेतकऱ्यांची वीज बिलमाफी या योजना चुकीच्या असून त्या सरकारला दिवाळखोरीकडे नेतील असे विधान करून आपले महिला व शेतकरीविरोधी आकस उघड केला. इतकेच नव्हे, लाडकी बहिण योजनेविरुद्ध षडयंत्रही जनतेसमोर आले, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कॉंग्रेसचे षंडयंत्र आम्ही हाणून पाडू. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि भाऊ त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

ते कोराडी (नागपूर) येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. कॉंग्रेसने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमधील महिलांसाठी सुरू असलेल्या योजना बंद पाडल्या किंवा जाहीर करून त्या पूर्ण केलेल्या नाहीत. कॉंग्रेसने मतदारांची फसवणूक केली, याकडे लक्ष वेधून बावनकुळे म्हणाले, “महाविकास आघाडीचे नेते भाऊबिजेच्या दिवशी महिलांचा अपमान करीत असून, आजचे संजय राऊत याचे विधान महिलांचा अपमान करणारे आहे. महिलांचा अपमान करणाऱ्यांना महिलांनी चप्पल दाखविली पाहिजे, महिलांचा अपमान लाडक्या बहिणी कदापिही सहन करणार नाहीत. त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवेल आणि वचपा काढतील.

  • राहुल गांधीचा खोटारडेपणा खोडून काढू!
    राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भारतातील एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण संपविण्याची भाषा केली आहे. नाना पटोले हे त्यांचे समर्थन करतात. देशाला आरक्षणाची गरज नाही असे म्हणणाऱ्या राहूल गांधी यांना आम्ही जाब विचारू. मागासवर्गीयांची मते घेण्यासाठी राहुल गांधी नागपुरात येत असून त्यांचा खोटारडेपणा आम्ही खोडून काढणार आहोत.
  • मविआ महाराष्ट्राला काय देणार!
    महाविकास आघाडीच्या नेत्यांजवळ बोलण्यासाठी काहीच मुद्दे नाहीत. मविआच्या सर्व नेत्यांना आव्हान आहे, त्यांनी आपला जाहीरनामा आणावा त्यात जनतेच्या विकासासाठी काय आहे हे दाखवावे. आम्ही सांगतो आहोत की, लाडक्या बहिणींना पाच वर्षांपर्यंत दरवर्षी १८ हजार रूपये देऊ, मध्यमवर्गीयांच्या घरांचे सूर्यघर योजनेतून वीज बिल माफ करू. पीक विमा योजना देऊ, त्याप्रमाणे मविआच्या नेत्यांनी जाहीर करावे.

ते असेही म्हणाले…

  • आव्हाड विकासाबद्दल बोलू शकत नाही. अडीच वर्षे जु्न्या घटनांवर बोलून सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांकडे मुद्दे नाहीत.
  • गोपाळ शेट्टी यांचे संपूर्ण आयुष्य भाजपामध्ये गेले ते उद्यापर्यंत निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला साथ देतील. दादाराव केचे यांचे आभार मानतो.
  • पक्षातील निष्ठावंत अर्ज मागे घेतील. पक्षाच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा पक्षाचे दरवाजे कायमचे बंद होतील.
  • अब्दुल सत्तार यांच्याशी असणारी लढाई स्थानिक मुद्यांवर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव निवडणुकीच्या लढाईत आणू नये.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading