Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

घोडेगाव येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

पुणे – “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, या‌द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु”, अशी शपथ १९६ -आंबेगाव विधानसभा मतदार संघाअंतर्गत घोडेगाव येथील काळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी घेतली.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी याठिकाणी मतदान जनजागृती पथकाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने घरातील सर्व पात्र मतदार असलेले ताई, दादा, आई, बाबा, काका, काकी अशा सर्वांनी मतदान करावे, याविषयी कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. आपल्याला असलेला मतदानाचा हक्क व तो बजावण्याचे कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करुन मतदानाचे महत्व यावेळी पटवून देण्यात आले. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या मतदारांनी १०० टक्के मतदान करणार असल्याचा संकल्प केला.

यावेळी स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सुनील भेके, तुषार शिंदे, नारायण गोरे, राहुल रहाटाडे, काशिनाथ घोंगडे, सुरेश रोंगटे, अशोक लोखंडे, सचिन तोडकर, विनायक राऊत, मंगेश जावळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading