कसबा पेठ विधानसभा मतदार संघाकरिता भीम सिंग यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती
पुणे भारत निवडणूक आयोगाने कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून भीम सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांनी दिली आहे.
श्री. सिंग यांचा निवासाचा पत्ता कक्ष क्रमांक ए ३०५, व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे असा असून त्याचा संपर्क क्रमांक क्र. ९२२६५७३६४६ व ई-मेल genobserver.kasba.hadapsar.conton@gmail.com असा आहे. श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी प्रशांत सूर्यवंशी असून त्यांचा संपर्क क्रमांक ९७६५९४११६६ असा आहे. श्री. सिंग हे व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध असतील.
श्री. सिंग यांनी मंगळवारी (२९ नोव्हेंबर) कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेवून संबंधित समन्वय अधिकारी यांना सूचना दिल्या, तसेच त्यांनी नामनिर्देशन प्रक्रियेची माहिती घेतली, असेही श्रीमती किसवे- देवकाते यांनी कळविले आहे.
