एआय, क्विक कॉमर्स, मायक्रो-इन्फ्लूएन्सर्स आणि रिजिनल लँग्वेज कन्टेन्ट यंदा सणासुदीच्या काळातील शॉपिंगला गती देत आहेत: मेटा रिपोर्टमधील निष्कर्ष
पुणे : सणासुदीच्या काळाला जल्लोषात सुरूवात झाली असताना मेटाने प्रचलित फेस्टिव्ह ट्रेण्ड्सबाबत आपल्या संशोधनामधील निष्पत्तींचे अनावरण केले आहे. मेटाद्वारे नेतृत्वित आणि कंझ्युमर इनसाइट्स प्लॅटफॉर्म जीडब्ल्यूआय या आघाडीच्या कंझ्युमर रिसर्च प्लॅटफॉर्मने सप्टेंबरमध्ये केलेले हे संशोधन यंदाच्या सणासुदीच्या काळातील शॉपिंग ट्रेण्ड्सना प्रकाशझोतात आणते.
मेटा येथील अॅड्स बिझनेस (इंडिया) चे संचालक व प्रमुख अरूण श्रीनिवास म्हणाले, ”या संशोधनामधून स्पष्टपणे दिसून येते की, भारतात सणासुदीच्या काळादरम्यान शॉपिंग ट्रेण्ड्समध्ये मोठा बदल होत आहे, जेथे एआय, क्विक कॉमर्सचा अवलंब, मायक्रो इन्फ्लूएन्सर्समध्ये वाढ आणि प्रादेशिक भाषा कन्टेन्ट सणासुदीच्या काळादरम्यान केल्या जाणाऱ्या खरेदीवर प्रभाव निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. विशेषत: आमच्या प्लॅटफॉर्म्सवर यंदा सणासुदीच्या काळात एआय समर्थित अॅड फॉर्मेट्सपासून बिझनेस सेजिंग व रील्सपर्यंत आमच्या सर्व प्रमुख उत्पादनांना प्रबळ प्राधान्य मिळताना दिसत आहे.”
या संशोधनामधील प्रमुख ट्रेण्डमधून निदर्शनास येते की, ई-कॉमर्समध्ये वाढ होत आहे आणि क्विक कॉमर्स नवीन श्रेणीमध्ये विस्तारित होत आहे, जेथे ग्राहक ४ पैकी १ इलेक्ट्रॉनिक खरेदी आणि ३ पैकी १ पर्सनल केअर खरेदी क्विक कॉमर्सच्या माध्यमातून करत आहेत. या माहितीमधून दिसून येते की, यंदाच्या सणासुदीच्या काळात अर्ध्याहून अधिक शॉपर्सना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून अधिक खरेदी करण्याची अपेक्षा आहे.
या संशोधनामधून निदर्शनास येते की, १० हजार ते १०० हजार फॉलोअर्स असलेले मायक्रो इन्फ्लूएन्सर्स १०० हजार ते १ दशलक्ष फॉलोअर्स असलेल्या मायक्रो इन्फ्लूएन्सर्सप्रमाणे सणासुदीच्या काळादरम्यान केल्या जाणाऱ्या खरेदीवर प्रभाव पाडत आहेत. तसेच या संशोधनामधून निदर्शनास आले की, सणासुदीच्या काळादरम्यान ब्रँड्स, डिल्स व सेल्स इव्हेण्ट्सचा शोध घेण्यासाठी इन्फ्लूएन्सर्सवर अवलंबून असलेल्या शॉपर्सपैकी ४० टक्के ग्राहकांवर मायक्रो-इन्फ्लूएन्सर्सचा, ३९ टक्के ग्राहकांवर माक्रो-इन्फ्लूएन्सर्सचा आणि २३ टक्के ग्राहकांवर नॅनो-इन्फ्लूएन्सर्सचा (१० हजार फॉलोअर्सपेक्षा कमी) प्रभाव आहे. याव्यतिरिक्त, प्रादेशिक भाषेतील जाहिराती फेस्टिव्ह सेल्सदरम्यान अधिक सहभागाला चालना देतात, जेथे ४ पैकी ३ ग्राहक म्हणतात की, सणासुदीच्या काळादरम्यान खरेदीसाठी त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये जाहिरात पाहणे महत्त्वाचे आहे.
एआय-समर्थित डिस्कव्हरी सणासुदीच्या काळादरम्यान ब्रँड्स, डिल्स आणि सेल्सचा शोध घेण्याला गती देत आहेत. या संशोधनामधून निदर्शनास आले की, ८० टक्के फेस्टिव्ह शॉपर्स मेटावर डिल्स आणि उत्पादनांचा शोध घेतात. तसेच, ८५ टक्के ग्राहकांना मेटाच्या माध्यमातून किमान एका सेल्स इव्हेण्टबाबत माहित आहे.
जीडब्ल्यूसोबत सहयोगाने करण्यात आलेल्या संशोधनामधून ग्राहक भावनेमधील आशावाद दिसून येतो, जेथे जवळपास पन्नास टक्के प्रतिसादक गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक खर्च करण्याचे नियोजन करत आहेत. या संशोधनामधून निदर्शनास येते की सणासुदीच्या काळात शॉपिंग ट्रेण्ड्सना अधिक गती मिळत राहिल, जेथे ९६ टक्के शॉपर्सना यंदा ऑनलाइन शॉपिंग, ई-कॉमर्सचा प्रवेश आणि क्विक कॉमर्समध्ये वाढ अशा घटकांमुळे त्यांच्या शॉपिंग करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे.
