Monday, June 8, 2026
Latest NewsSports

‘आयएसएसएफ वर्ल्डकप फायनल्स’ स्पर्धेसाठी पुण्याच्या पवन सिंह यांची स्पर्धा व्यवस्थापक म्हणून नियुक्ती


पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध गन फॉर ग्लोरी या नेमबाजी (शुटींग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक व नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे संयुक्त महासचिव पवन सिंह यांची नवी दिल्ली येथे आजपासून सुरु झालेल्या आयएसएसएफ (इंटरनॅशनल शुटींग स्पोर्ट फेडरेशन)  वर्ल्डकप फायनल्ससाठी स्पर्धा व्यवस्थापक (कॉम्पिटीशन मॅनेजर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंह यांच्या गौरवशाली कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा असून त्यांनी यापूर्वी भारतात झालेल्या अनेक नेमबाजी विश्वचषकांसाठी स्पर्धा व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे.

नेमबाजी क्रीडा क्षेत्रात सिंह यांचे असलेले कौशल्य आणि अनुभव यामुळे आज आयएसएसएफ वर्ल्ड कप फायनल्स या स्पर्धेसाठी स्पर्धा व्यवस्थापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून मागील टोकियो आणि पॅरिस या दोन ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य म्हणून काम करणारे ते एकमेव भारतीय आहेत.

आयएसएसएफ वर्ल्डकप फायनल्सच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पवन सिंह यांचे खेळाविषयीचे ज्ञान आणि समज मोलाची ठरणार आहे. स्पर्धा व्यवस्थापक म्हणून, सिंह हे स्पर्धेच्या सर्व पैलूंवर देखरेख करतील यामध्ये स्पर्धेचे वेळापत्रक, स्थळ व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा नियमांचे पालन सुनिश्चित करणे यांचा समावेश असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading