डीपी वर्ल्ड न्हावा शेवातर्फे एम.व्ही.लोकजेद्दाहच्या उद्घाटनासह इंडिया रेड सी सेवेचा शुभारंभ
मुंबई : डीपी वर्ल्ड या जागतिक पुरवठादार आणि आघाडीच्या स्मार्ट एंड-टू-एंड सप्लाय चेन सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीने न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी) येथे एम.व्ही.फोक जेद्दाह या जहाजाचं स्वागत केलं.
या पहिल्या प्रवासातून इंडिया रेड सी सेवेची (IRS) सुरुवात झाली. या नवीन सेवेमुळे भारतातील महत्त्वाच्या बंदरांमध्ये संपर्क आणखी मजबूत होईल आणि मध्य पूर्वेतील व्यापार वाढण्यासाठी सुद्धा हातभार लागेल.
आयआरएस सेवेच्या पोर्ट रोटेशनमध्ये न्हावा शेवा, मुंद्रा, जेद्दाह आणि सलाला या बंदरांचा समावेश आहे. या मार्गावर ते भारताच्या दोन महत्त्वाच्या बंदरांना जोडण्याचं काम करतात. या नवीन मार्गामुळे वाहतुकीचा वेळ कमी होईल आणि प्रमुख बंदरांमध्ये प्रवेश मिळेलच पण त्याच बरोबर मध्य पूर्व आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापारासाठी प्रोत्साहन मिळेल आणि दळणवळणाला चालना मिळेल.
डीपी वर्ल्ड सबकॉन्टिनेंट आणि मेना रिजनचे पोर्ट्स अँड टर्मिनल्स, ऑपरेशन्स अँड कमर्शिअल चे सीओओ रवींद्र जोहल म्हणाले, “इंडिया रेड सी सर्व्हिसची सुरुवात म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये व्यापार वाढविण्याच्या दिशेने टाकलेलं एक धोरणात्मक पाऊल आहे. त्यामुळे २०३० पर्यंत निर्यात वाढविण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला आणखी बळकटी मिळेल. ही सेवा सप्लाय चेन सुरळीत करण्यासाठी आणि प्रमुख बंदरांमध्ये दळवळण आणखी मजबूत करण्यासाठी तयार केली गेली आहे. यामुळे आणखी जोमाने व्यापार करण्याची संधी व्यापाऱ्यांना मिळेल. या नव्या सेवेमुळे भारत आणि मध्य पूर्वेतील देशामध्ये व्यापाराला आणखी चालना मिळेल. डीपी वर्ल्डमध्ये आर्थिक विकासाबरोबरच नव्या बाजारपेठेत प्रवेश आणि त्यांच्या सप्लाय चेनचं नियमन करणं हे आमचं उद्दिष्ट आहे.”
शिवाय, डीपी वर्ल्ड त्याचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी आणि व्यापार शाश्वत पद्धतीने चालावा यासाठी कटिबद्ध आहे.
बंदरांवरील व्यवहार सुरळीत व्हावा यासाठी पुर्ननवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वत पद्धतींचं एकत्रीकरण करण्याचे कंपनीने सातत्याने प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून डीपी वर्ल्डने हरित ऊर्जा प्रकल्प आणला आहे. याची क्षमता ११ मेगावॅट आहे. या उपक्रमामुळे एनएसआयसीटी येथे लागणाऱ्या ७५ टक्के आणि एनएसजीआयटी येथे लागणाऱ्या ८० टक्के पारंपरिक उर्जेची बचत होईल. तसंच कार्बन उत्सर्जनात ५० टक्क्यांची घट होईल.
डीपी वर्ल्ड पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी आणि व्यापार शाश्वत कार्यपद्धतीने चालवण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतातील बंदरांवर असलेल्या टर्मिनल्सच्या दैनंदिन कामकाजात अक्षय ऊर्जा आणि शाश्वत पद्धती यांचं एकत्रीकरण करून कंपनीने नवे आयाम प्रस्थापित केले आहेत. सागरी क्षेत्राची हरित भविष्याकडे वाटचाल होण्याच्या दृष्टीने डीपी वर्ल्डने न्हावा शेवा प्रकल्पावर हरित उर्जा वापरून वीजनिर्मितीला सुरुवात केली आहे. या प्रकल्पाची क्षमता ११ मेगावॅट आहे. या उपक्रमामुळे एनएसआयसीटी येथे लागणाऱ्या ७५ टक्के आणि एनएसजीआयटी येथे लागणाऱ्या ८० टक्के पारंपरिक उर्जेची बचत होईल. तसंच कार्बन उत्सर्जनात ५० टक्क्यांची घट होईल.
