Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या मार्गावर असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठमोठे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. त्यातच आज राज्य सरकारने मुंबई हलक्या वाहनांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईकर तरी आनंदात आहे.

मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आज १४ ऑक्टोबर मध्यरात्री बारा वाजेपासून याची अंमलबजावणी होईल.

हलकी वाहने, शाळेच्या बसेस आणि एसटी बसेस यांना ही पथकरातून सूट राहील. सायन पनवेल महामार्गावर वाशी येथे, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथील पथकर नाक्यावर याची अंमलबजावणी होईल.  पथकरातून सूट दिल्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळास द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading