Monday, June 8, 2026
ENTERTAINMENTLatest News

द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये कपूर बहिणींनी बॉलीवूड, फॅमिली आणि लव्ह लाइफबद्दल खुलासा केला

नेटफ्लिक्सच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये, चाहत्यांना पहिल्यांदाच करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान या पॉप्युलर बहिणीची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. कपूर बहिणीं त्यांच्या अंदाजामध्ये, मजेदार आणि न माहित असलेले किस्से शेयर करणार आहे आणि प्रेक्षकांना खूप हसवणार आहे. कपिल शर्मा या दोघी बहिणी एकमेकांना किती चांगल्या प्रकारे ओळखतात, त्यांची फेमस कपूर फॅमिली, त्यांचा बॉलीवूडचा प्रवास, त्यांच्या बालपणीच्या आठवणी आणि फिल्मच्या सेटबद्दल जाणून घेणार आहे.

करीना आणि सैफ अली खानच्या रिलेशनशिप बद्दल कळल्यानंतर करिश्माने तिची प्रतिक्रिया काय होती याबद्दल मजेशीर पद्धतीने सांगितले. करिश्मा म्हणाली, “मला आठवते, मी लंडनमध्ये होते आणि त्यावेळी मला करीनाचा फोन आला. मी विचारलं काय झालं, तर करीना म्हणाली, मला तुला काहीतरी सांगायचं आहे पण मी तुला काही सांगण्याआधी, मला वाटते कुठे शांत जागा असेल तर तिथे बसावं. करिश्माने सांगितले की, त्यावेळी मी एका शॉपमध्ये होती, तिथे एक सोफा होता आणि मी सोफ्यावर बसली. तेव्हा करीनाने सांगितले, “हे बघ, गोष्ट अशी आहे की मी सैफच्या प्रेमात आहे.”

सैफ आधी तिचा को-स्टार होता. करिश्माची ही गोष्ट ऐकून सगळे हसायला लागले आणि स्टुडिओत हास्याचे वातावरण निर्माण झाले! यावर करिश्माची प्रतिक्रिया काय होती? करिश्माने करीनाच्या रिलेशनशिप बद्दल काय उत्तर दिले हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा द ग्रेट इंडियन कपिल शो.

अशाच अनेक मनोरंजक किस्स्यासोबत, प्रेक्षक कपूर बहिणींना आधी पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी तयार नाहीत, तर त्यांचे गाल दुखेपर्यंत हसण्यासाठी देखील तयार आहेत.

तर द ग्रेट इंडियन कपिल शो पहा, फक्त नेटफ्लिक्सवर, कारण या कपूर बहिणी नक्कीच तुमचा शनिवार मजेदार बनवतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading