Monday, June 8, 2026
ENTERTAINMENTLatest News

दुष्मनीने तोडलं पण प्रेमाने जोडलं… येतेय महाराष्ट्राची झन्नाट लव्हस्टोरी ‘#लय आवडतेस तू मला’

 

नवी प्रेमकहाणी ‘#लय आवडतेस तू मला’ 14 ऑक्टोबरपासून दररोज रात्री 9:30 वा. आपल्या कलर्स मराठीवर

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीने ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच समोर आणली आणि प्रेक्षकांच्या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे. या मालिकेच्या माध्यमातून एक अनोखी आणि उत्कंठावर्धक कथा उलगडली जाणार आहे. कळशीचा छावा आणि साखरगावच्या सानिकाची झन्नाट लव्हस्टोरी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेलं. नुकताच या मालिकेचा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा प्रोमो आऊट झाला आहे.

कळशी आणि साखरगाव या दोन गावांमधील वादाची आणि प्रेमामुळे सुरू झालेल्या दुष्मनीची कथा प्रेक्षकांना ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत पाहायला मिळणार असल्याचं प्रोमोवरुन स्पष्ट होत आहे. कळशी गावात कोणीही हिंसा केली तर त्याला हद्दपार करण्यात येतं. तर साखरगावात मात्र हिंसेला वाव आहे. ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत सरकारच्या भूमिकेत तन्मय जक्का तर सानिकाच्या भूमिकेत सानिका मोजर झळकत आहे. तसेच प्रोमोत दिसणारे दोन पात्रांमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सोशल मीडियावर चर्चेत असणारे, रोखठोक बोलणारे अभिनेते किरण माने या मालिकेत सरकारच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. त्यांची सकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. दुसरीकडे सानिकाचे वडील साहेबराव पाटील यांच्या भूमिकेत संजय खापरे आहेत. साहेबरावांचा मालिकेतील वावर अंगावर शहारे आणणारा आहे. मालिकेत आणखी कोणते कलाकार झळकणार हे लवकरच समोर येईल.

सानिका आणि सरकारला त्यांच्या प्रेमाचा सामना त्यांच्या गावातील पिढीजात शत्रूत्वाने करावा लागत आहे. त्यामुळे कथेला एक वेगळा रंग येत आहे. प्रोमोमध्ये प्रेम आणि शत्रूत्वाचा एक वेगळा बाज पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये सानिका आणि सरकारची झन्नाट लव्हस्टोरी कशी फुलणार हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की पाहा. ‘#लय आवडतेस तू मला’ 14 ऑक्टोबरपासून दररोज रात्री 9:30 वाजता आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर.

LATM #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading