Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या यशोदा मातृ दुग्ध पेढीला दक्षिण आशिया लॅम्बकॉन परिषदेमध्ये प्रतिष्ठीत तीन पुरस्कार प्रदान

पुणे :  डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राचा अग्रगण्य अग्रगण्य उपक्रम असलेल्या यशोदा मातृ दुग्ध पेढीने दुग्धपान व्यवस्थापन, दूग्धबँकिंग आणि स्तनपान विषयावरील चौथ्या दक्षिण आशिया लॅम्बकॉन परिषदेत तीन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. यशोदा ॲडव्हान्स्ड ह्युमन मिल्क बँकेच्या डॉ. शैलजा माने आणि त्यांच्या तुकडीला सर्वोत्कृष्ट दूध बँकेसाठी देण्यात येणारा प्रथम क्रमांकाच्या ‘धात्री” पुरस्काराने, तर ‘सुशेना” पुरस्काराने छाया मागाडे यांना सर्वोत्कृष्ट आरोग्य कार्यकर्ता श्रेणीतील प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आणि दुग्धदात्या माता नीता पलारिया यांना “माँ यशोदा’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

हे पुरस्कार माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याला चालना देण्याप्रति संस्थेची वचनबद्धता आणि स्तनपान व स्तनपान व्यवस्थापनास समर्थन देण्याच्या निरंतर समर्पणाचे प्रतिबिंब आहे. यशोदा मातृ दुग्ध पेढीच्या संपूर्ण कर्मचारीवर्गाने दिलेल्या समर्पित सेवेची ही पोचपावती आहे.

यशोदा मातृ दुग्ध पेढीने स्थापनेपासून माता आणि बालकांची उत्तम सेवा केली आहे. या दुग्ध बँकेने २०१३ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत १८,८८० दात्यांना मदत केली असून, एकूण ५४,४४,२९ मिली दूध गोळा केले आहे. यशोदा दुग्ध बँकेने २६,९२७ बाळांना ५०,५२,९७१ मिली दूध वितरित केले आहे.  यंदा सप्टेंबरपर्यंत बँकेने १८९० दुग्धदात्यांची नोंद केली असून, ६,३६,३३० मिली दूध गोळा केले आहे आणि २५८७ बाळांना ५६३७६५ मिली दूध वितरित केले आहे.

 डॉ. भाग्यश्री पाटील  प्र-कुलपती – डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी,  पुणे यांनी यशोदा मातृ दुग्ध पेढीच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “यशोदा मातृ दुग्ध पेढीच्या संपूर्ण चमूने केलेल्या अथक परिश्रमांना मिळालेली ही पोचपावती आहे. येथे आम्ही मातांना सशक्त बनवण्यासाठी आणि प्रत्येक नवजात बाळाची उत्तम निरोगी आरोग्याला आम्ही वचनबद्ध आहोत. भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्यावर आणि कल्याणावर कायमस्वरूपी प्रभाव पाडण्याचा आमचा प्रयत्न असल्याने या पुरस्कारांमुळे आम्हाला माता आणि नवजात बालकांची काळजी घेण्याच्या मार्गावर  आणखी पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. माता आणि अर्भक दोघांचेही पालनपोषण करून आणि त्यांना आधार देऊन आपण उद्याची  एक निरोगी पिढी घडवू  शकतो.”

डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली यशोदा ॲडव्हान्स्ड ह्युमन मिल्क बँक स्तनपान आणि नवजात बालक निगा क्षेत्रातील उत्कृष्ट केंद्र म्हणून स्थान मिळविले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्था माता आणि नवजात मुलांसाठी दीपस्तंभ बनली आहे. येथे मातृ दुग्ध पेढी आणि स्तनपान व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींचे पालन केले जाते.

या पुरस्कारांबद्दल बोलताना बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा माने म्हणाल्या, “ही ओळख केवळ सन्मान नाही, तर आमची टीम यशोदा ॲडव्हान्स्ड ह्युमन मिल्क बँकेत समर्पित आणि करुणा भावनेने करत असलेल्या कामाचे प्रतिबिंब आहे. माता आणि त्यांच्या नवजात बालकांना सर्वांगीण सहाय्य प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे. त्यांना आवश्यक असलेली काळजी आणि पोषण मिळावे हे सुनिश्चित करणे या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. हे पुरस्कार आम्हाला स्तनपान आणि स्तनपान व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठीचे आमचे प्रयत्न असेच पुढे चालू ठेवण्यासाठी प्रेरणा देतात.  मला आमच्या संघाच्या सामूहिक वचनबद्धतेचा अभिमान वाटतो.”

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉ. जे.एस. भवाळकर म्हणाले, “यशोदा ॲडव्हान्स्ड ह्युमन मिल्क बँकेला मिळालेले प्रतिष्ठित तीन पुरस्काराने आज आमच्या संस्थेचा देशभर  नावलौकिक वाढला आहे. मिळालेली ही पाठीवरची थाप पुढील कार्याला नव्या उमेदीचे बळ देणारी ठरेल.   माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यसाठी केल्या कामाची ही नोंद आहे.  आमच्या संस्थेमध्ये रुग्णसेवेसाठी नावीन्यपूर्णतेची सर्वोच्च मानके कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे पुरस्कार केवळ आमच्या कर्मचाऱ्यांच्या अतुलनीय कार्याचीच कबुली देत नाहीत तर आरोग्यसेवेत आघाडीवर राहण्याची, समाजासाठी आणि त्याहूनही पुढे उत्कृष्टतेचे मॉडेल म्हणून काम करण्याची आमची बांधिलकी आणखी मजबूत करतात.”

पुरस्कार विजेत्या संघात डॉ. शैलजा माने, विभागप्रमुख, बालरोग व यशोदा मातृ दुग्ध पेढी, संचालक व स्तनपान सल्लागार डॉ. पल्लवी तुपकर यासारख्या प्रमुख आरोग्यसेवा व्यावसायिकांचा समावेश आहे. स्नेहा बागुल, सुभद्रा तांबे, छाया राव, सारिका इर्लापल्ले, सुनीता भालके, योगिता गायकवाड, पूजा गवई आणि वनिता दुर्गे यांच्यासह छाया मागाडे (प्रभारी सिस्टर) यांच्या नेतृत्वाखालील नर्सिंग स्टाफच्या समर्पणामुळे हे यश साध्य करणे शक्य झाले आहे. या महत्त्वपूर्ण यशामुळे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राची माता व बाल रुग्णसेवा क्षेत्रातील एक अग्रणी संस्था म्हणून स्थिती मजबूत झाली असून, ती संपूर्ण राज्यातील माता आणि अर्भकांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी समर्पित आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading