टायटनने सणासुदीसाठी सादर केले स्टेलर २.० कलेक्शन: एक्स्प्लोर द अनएक्सप्लोर्ड
कॉसमॉस-थीमच्या या कलेक्शनसोबत, उत्तमोत्तम डिझाईन आणि नाविन्याचा निरंतर शोध घेत टायटन घड्याळ निर्मितीमध्ये उत्कृष्टतेच्या शिखरावर पोहोचले आहे
मुंबई : भारतातील आघाडीचा घड्याळ ब्रँड, टायटन वॉचेसने आगामी सणासुदीच्या हंगामासाठी त्यांचे बहुप्रतिक्षित स्टेलर 2.0 कलेक्शन लॉन्च केले आहे. गेल्या वर्षीच्या कॉस्मिक-प्रेरित घड्याळांना मिळालेल्या उल्लेखनीय यशानंतर, स्टेलर 2.0 कलेक्शन घड्याळ बनवण्याच्या कलेला नवीन उंचीवर घेऊन गेले आहे. ब्रह्मांडाचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव हे कलेक्शन प्रदान करते. खगोलीय कॅनव्हासने प्रेरित असलेले हे नवीन कलेक्शन, मनुष्याच्या मनातील आकाशाबद्दलच्या कालातीत आकर्षणाची आठवण करून देते. क्लिष्ट डिझाईन्स आणि नाविन्यपूर्ण सामग्रीसह खगोलीय चमत्कारांचे सौंदर्य यामधून प्रतीत होते.
१३ उत्कृष्ट घड्याळांचे हे कलेक्शन भारतातील घड्याळ निर्मितीमध्ये नवे मापदंड रचते. या कलेक्शनमध्ये तीन मुख्य वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे: मुव्हमेंट्स, मटेरियल आणि फंक्शनॅलिटी. टायटनच्या खास इन-हाऊस ऑटोमॅटिक मुव्हमेंटमध्ये ओपन हार्ट, मल्टी-फंक्शन, सन-मून आणि मून-फेज यांचा समावेश आहे, जे अतुलनीय अचूकतेसह किचकट फंक्शन्सना क्षमता प्रदान करतात. दुर्मिळ अर्थ मटेरियल्स – कम्बाबा जॅस्पर, ॲव्हेंच्युरिन, टायगर आय आणि प्राचीन मुओनिओनालुस्टा उल्का यांचे नाविन्यपूर्ण एकत्रीकरण तुमच्या मनगटाला खगोलीय वैभव प्रदान करते. या घड्याळासोबत प्रत्येक क्षण विश्वाचा एक अद्भुत, विलक्षण प्रवास बनतो. कार्यक्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास, कलेक्शनमध्ये चंद्र-फेज इंडिकेटर्स आणि सूर्य-चंद्र डिस्प्ले यासारखे लक्षवेधी घटक आहेत, जे चंद्राच्या विविध कलांचे आणि दिवस आणि रात्र दरम्यानच्या प्रकाशाच्या जादुई परस्परसंवादाचे कलात्मकपणे चित्रण करतात.
कलेक्शन सादर करताना, टायटन कंपनी लिमिटेडचे एमडी सीके वेंकटरामन म्हणाले, “गेल्या काही वर्षांत, टायटनने प्रिमियमायजेशन, नवनिर्मिती आणि उत्कृष्टता साध्य करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. स्टेलर २.० कलेक्शन टायटनच्या घड्याळ निर्मितीमधील उत्क्रांती आणि उत्कृष्टता दर्शवते, आम्ही आमच्या इन-हाउस मुव्हमेंट्स तसेच दुर्मिळ अर्थ मटेरियल्स वापरून अद्वितीय घड्याळे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी भारतातील घड्याळ निर्मितीमध्ये नवीन मानके स्थापित केली आहेत. घड्याळांमध्ये फक्त फंक्शनॅलिटीच नव्हे तर, स्टाईल आणि नावीन्य हवे असणाऱ्या, चोखंदळ प्रीमियम ग्राहकांच्या आवडीनिवडीबाबत आमची सखोल समज या कलेक्शनमधून दिसून येते. अतुलनीय दर्जा आणि व्हिजनरी डिझाईन तयार करण्याप्रती आमची बांधिलकी हे कलेक्शन दर्शवते. ब्रह्मान्डातील आश्चर्यांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेले हे कलेक्शन घड्याळ निर्मितीच्या सीमा ओलांडून भारतातील घड्याळ बनवण्याच्या कलेला जागतिक पातळीवर नव्या क्षितिजांपर्यंत पोहोचवते.”
स्टेलर 2.0 मध्ये तीन वेगवेगळ्या सीरिजमध्ये ज्ञात नसलेल्या जगाचा शोध घेतला गेला आहे – कॅलेम, पृथ्वीवरून दिसणाऱ्या, आकाशातील तेजस्वी पॅटर्न्सनी प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे, कायम बदलत्या आकाशाच्या कॅनव्हासचे सौंदर्य आपल्यासमोर मांडते. लुना – चंद्र आणि ग्रहांच्या पृष्ठभागापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे, यामध्ये ऍव्हेंट्युरिनसारख्या मटेरियल्सपासून तयार केलेली डायल आहे, जी ताऱ्यांनी झगमगणारे आकाश दर्शवते. कबाम्बा जॅस्पर आकाशगंगांच्या रचनांची आठवण करून देते. या कलेक्शनचा शिरोमणी ऍस्ट्रा १२०,००० वर्षे प्राचीन, मूळ म्युऑनिओनलीस्टा उल्केपासून तयार करण्यात आले आहे, जे उल्का आणि ताऱ्यांचे ब्रह्मांडीय जीवनचक्र दर्शवते.
