Monday, June 8, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNETOP NEWS

२३वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५;  मराठी चित्रपटांना स्पर्धेत सेन्सॉर सर्टिफिकेट विना प्रवेश

पुणे : २३वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढीलवर्षी १६ ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न होत असून या महोत्सवातील जागतिक मराठी चित्रपट स्पर्धेसाठी सेन्सॉर सर्टिफिकेट विना प्रवेश यंदा दिला जाणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२४ अखेर सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालेल्या किंवा न मिळालेल्या मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना देखील आपल्या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची अभूतपूर्व संधी मिळणार आहे. या जागतिक स्पर्धेत मराठी चित्रपटांच्या प्रवेशासाठी अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२४ ही आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान निर्मित किंवा सेन्सॉर झालेले व सेन्सॉरसाठी अर्ज केलेले चित्रपटच स्पर्धेसाठी पात्र ठरतीलअशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे डेप्युटी डायरेक्टर विशाल शिंदे यांनी दिली.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवडलेल्या चित्रपटांमधून आंतरराष्ट्रीय ज्युरी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाची निवड करतील. महाराष्ट्र शासनाचा ‘संत तुकाराम सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटास’ ५ लाख रुपयांच्या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या सोबतच मराठी चित्रपटांसाठी ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’तर्फे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – रु. 25,000सर्वोत्कृष्ट अभिनेता – रु. 25,000सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रु 25,000सर्वोत्कृष्ट पटकथा – रु. 25,000 आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – रु. 25,000 ही बक्षिसेही दिली जातील. महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात या सर्व पुरस्कारांचे वितरण केले जाईल.  

सेन्सॉर सर्टिफिकेट विना प्रवेशासाठी नियम महोत्सवाच्या वेबसाईटवर www.piffindia.com यावर उपलब्ध आहे असे डेप्युटी डायरेक्टर विशाल शिंदे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading