नवीन निसान मॅग्नाइट प्रोव्हिन्शियल निसान पुणे येथे लॉन्च
पुणे : निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने प्रोव्हिन्शियल निसान पुणे येथे एका शानदार समारंभात नवीन निसान मॅग्नाइट कार लाँच केली. या कारचे अनावरण श्री प्रकाश भेगडे, शिवसेना भोर विधानसभेचे आयोजक व श्री संदिप आमले सरपंच घोटवडे मुळशी यांच्या हस्ते राजदीप बोस एरिया सेल्स मॅनेजर एनएमआयपीएल, मुकुल बोरकर एरिया मॅनेज सर्व्हिस एनएमआयपीएल, जितेंद्र पाटील जीएम सेल्स, विशाल कांबळे एजीएम सेल्स प्रोव्हिन्शिअल कार एलएलपी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.नवीन निसान मॅग्नाइट दमदार रोड उपस्थितीसह, भारतात रीडिझाइन केलेल्या प्रिमियम एक्सटीरियर आणि इंटीरियर डिझाइन आणि 20 पेक्षा जास्त सेगमेंट-फर्स्ट फीचर्ससह येते. नवीन मॅग्नाइट मोठ्या आणि ठळकपणे रीडिझाइन केलेल्या “हनीकॉम्ब” ग्रिलने आकर्षित करते, हाय ग्राउंड क्लीयरन्स त्याला एक प्रभावी स्टेन्स देते, तर इंटीरियर डिझाइनमध्ये शार्प लेदर फिनिशसह अधिक प्रीमियम आकर्षकता आहे.नवीन निसान मॅग्नाइट मजबूत बॉडी स्ट्रक्चर, सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि हायड्रोलिक ब्रेक असिस्टसह 40 पेक्षा जास्त स्टँडर्ड सेफ्टी फीचर्ससह उत्तम सुरक्षा देते. आता 4 पॉवरट्रेन पर्याय 1.0 लिटर पेट्रोल एमटी आणि ईझेड-शिफ्ट आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल एमटी आणि सीव्हीटी मध्ये 18 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
नवीन निसान मॅग्नाइटमध्ये एलईडी बाय-प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी लाइटसेबर- स्टाईल टर्न इंडिकेटर, बेस्ट-इन-क्लास रीअर नी रूम, बेस्ट-इन-क्लास ‘कपल डिस्टन्स’ (फ्रंट रो शोल्डर रूम) 3डी हनीकॉम्ब ग्रेडियंट इफेक्टसह नवीन निसान मॅग्नाइट एलईडी टेल लॅम्प(बेस्ट-इन-क्लास), एलईडी एल- शेप डेटाइम रनिंग लाइट्स, एलईडी फॉग लॅम्प, 205 मिमी ग्राउंड क्लीयरन्स, एलईडी फॉग लॅम्प बेस्ट-इन-क्लास टर्निंग रेडियस (5.0 मी), 360 लेदर पॅक – सीट अपहोल्स्ट्री, डोअर ट्रिम, रॅप्ड डॅशबोर्ड, 50 किलोग्राम लोड बेअरिंगसह फंक्शनल रूफ रेल, बेस्ट-इन-क्लास 19 लिटर पेक्षा जास्त केबिन स्टोरेज स्पेस, स्टँडर्ड 60:40 सीट स्प्लिटसह 336 लिटर ते 540 लिटर एक्सपांडेबल बूट स्पेस इत्यादी फीचर्स आहे.नवीन निसान मॅग्नाइट ड्युअल टोन मध्ये: “सनराईज कॉपर ऑरेंज अँड ब्लॅक, ब्लेड सिल्व्हर आणि ऑनिक्स ब्लॅक, फ्लेअर गार्नेट रेड अँड ऑनिक्स ब्लॅक, व्हिव्हिड ब्लू आणि ऑनिक्स ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि ऑनिक्स ब्लॅक आणि मोनो टोन मध्ये: सनराइज कॉपर ऑरेंज, फ्लेअर गार्नेट रेड, ओनिक्स ब्लॅक, ब्लेड सिल्व्हर, स्टॉर्म व्हाइट, पर्ल व्हाइट, विविड ब्लू या 12 आकर्षक कलर्स सह येतो.”
नवीन निसान मॅग्नाइट 5.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.टेस्ट ड्राइव्ह आणि अधिक माहितीसाठी कृपया मेसर्स प्रोव्हिन्शियल कार, एलएलपी, 25/A/26/A, शेड नंबर 3, बालतुका इस्टेट बंगलोर, मुंबई हायवे, रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ, बावधन, पुणे, महाराष्ट्र 411021
