Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

आयटी आणि आयटीइएस क्षेत्रातील विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – चंद्रकांत पाटील 

पुणे : अंकुर प्रतिष्ठान व आयटी आणि आयटीइएस  यांच्या संयुक्त विद्यमानाने कोथरूड मधील आयटी व आयटीइएस क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा चंद्रकांत पाटील यांच्या सोबत संवाद सोहळा नुकताच संपन्न झाला.

या संवादामध्ये प्रामुख्याने दीपक शिकारपूर प्रतीथयश लेखक, आयटी क्षेत्रातील एक विचारवंत यांनी संवादाची सुरवात करतानाचं या क्षेत्रातील अडचणी व त्यासोबत काही पर्याय अशी सकारात्मक मांडणी करत असतानाच ठराविक कालावधीच्या अंतराने भेटत राहून सातत्याने आढावा घेत योग्य दिशेने काम करत राहिल्यास उद्दिष्ट नक्की सफल होते हा कानमंत्र ही दिला. त्याच सोबत महिला सुरक्षेचे अगदी साधे, सोपे व लगेच आमलात आणता येण्यासारखे पर्याय ही सुचविले.

त्यानंतर किशोर विखे या कॅपजेमिनी या प्रतीथयश संस्थेचे वाईस प्रेसिडेंट यांनी दळणवळणाच्या समस्येवर एक अंमलात आणता येणारा पर्याय सुचविला व या संवादाला त्यांना बोलवल्याबाबत आयोजक व माननीय दादांचे आभार मानले व त्यांनी दादांना आश्वस्त केले की, माझ्या कंपनीतर्फे देखील आपण काही गोष्टी करू शकतो आणि त्या तुमच्यासोबत करायला मला निश्चितपणे आवडेल.

एस्सेंट इंटेलिमेशन प्रायव्हेट लिमिटेड चे CEO डॉ. अरविंद टिळक म्हणाले की निश्चितपणे राज्यकर्ते प्रशासन व आम्ही असे एकत्रितपणे विचारविनिमय करून संवादातून  काम केले तर या क्षेत्रातील अडचणींवर मात करून खूप चांगल्या प्रकारे आपण आपला, आपल्या परिसरातला, आपल्या व्यवसायातला, आपला प्रगतीचा आलेख उंचावू शकतो व समाजातही काही योगदान निश्चितपणे देऊ शकतो.

मास्टर स्ट्रोक मास्टर टेक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि कापा डेटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे फाउंडर मेंबर श्री प्रसाद खाडिलकर यांनी वरील विषयांबाबत त्यांचे मते व्यक्त करत आलेल्या बाकी मान्यवरांच्या वतीने देखील दोन महत्त्वाचे मुद्दे मांडत आपणही यात योगदान व वेळ देऊ शकतो असे आवर्जून माननीय दादांना सांगितले.

डिझाइनटेक सिस्टिम्सस् प्रायव्हेट लिमिटेड चे मॅनॅगिंग डायरेक्टर विकास खानवेलकर यांनी देखील त्यांच्या अनुभवाचे चार बोल सांगत, त्यातील अडचणी व आत्ताच्या काळासाठी सुसंगत व आवश्यक असे काही पर्याय देखील सुचवले.

ActDBI Inc. या अमेरिकन कंपनीच्या तरूण उद्योजिका सौ रूही गर्ग यांनी देशातील व विदेशातील स्टार्टअप कंपनीच्या वागणुकीतील फरक स्पष्ट करताना युवा पिढीच्या व स्टार्टअप कंपन्यांच्या भारताकडून काय अपेक्षा आहेत याबाबत माननीय दादांशी संवाद साधला

इन्फोसिस इंडिया चे पुण्याचे केंद्र प्रमुख प्रविण कुलकर्णी ते कसे रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात व त्यासाठी आवश्यक असणारे स्किल कसे शिक्षण संस्था मधूनच डेव्हलप झाले पाहिजे याविषयीचे त्यांचे विचार मांडले.

एकूण या सात मान्यवरांनी उपस्थित सर्वांच्या वतीने माननीय दादांशी संवाद साधला या संवादाचे स्वरूप साधारणपणे आयटी क्षेत्रातील समस्या, रोजगार निर्मिती, रोजगारासाठी आवश्यक असणारे स्किल्स, त्यासाठी लागणारे आवश्यक शिक्षण, दळणवळणामध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावरील पर्याय तसेच या सर्व मंडळींची त्यात काय मदत होऊ शकेल याबाबत संवाद साधला. त्यांना सुचणारे पर्याय ही सुचवण्यात आले.

सुरुवातीलाच या सर्व मान्यवरांनी असा संवाद आयोजित केल्याबद्दल व या क्षेत्राबद्दल इतकी संवेदनशीलता दाखवल्याबद्दल संयोजकांचे तसेच माननीय चंद्रकांत दादांचे मनापासून आभार मानले व अभिनंदन केले.

हा उपक्रम ही एक नवीन एकत्रित कार्याची सुरुवात आहे असे संयोजकांत तर्फे जाहीर करण्यात आले  सुमारे ५० आयटी क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना  अंकूर प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे शहर चिटणीस कुलदीप सावळेकर यांनी सांगितले या उपक्रमाचा प्रमुख उद्देश या क्षेत्रातील समस्या तसेच या क्षेत्रातील मान्यवरांचे सामाजिक प्रगती व उन्नतीसाठीचे योगदान आणि मतदानातील कमी झालेला टक्का वाढवणे असा असून आजच्या संवादातून एक ठोस आखणी करता येईल व त्याप्रमाणे पुढील कार्यक्रमांचे नियोजन करून अनेक गोष्टी प्रत्यक्षात उतरवता येतील.

चंद्रकांत पाटील यांनी देखील या सर्वांबरोबर संवाद साधताना त्यांच्या ८०% प्रश्नांचे, समस्यांचे निराकरण तात्काळ तेथेच केले. त्याचबरोबर त्यांनी सुचवलेल्या पर्यायांचे देखील स्वागत केले आणि संयुक्तिकरित्या या क्षेत्राचा तसेच त्या योगे समाजाचा प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की मी आपल्या सर्व पॅनलसचे अभिनंदन करतो की आपण सर्वजण आपल्या विषयांमध्ये अत्यंत सखोल विचार करून मांडणी करत आहात त्याचबरोबर समोर बसलेल्या सर्व मंडळींना देखील मी आश्वस्त करतो की तुमच्या मनातले प्रश्न व त्यांची आज इथे मांडणी झाली आहे असे सर्वच विषय नजीकच्या भविष्या काळामध्ये आपण १००% हाताळू त्यासाठी लागणाऱ्या इतर प्रशासकीय व्यवस्था तसेच राजकीय शक्ती व मदतीची आवश्यकता या सर्वांचा समावेश करत निश्चितपणे आपण एक ठोस कार्यक्रम पत्रिका करून त्यानुसार काम करूया.

सदर उपक्रमास या सर्व निमंत्रितांना आमंत्रित करण्यआचे महत्त्वाचे दायित्व  अतुल शहा सर, डॉ. विक्रमसिंह देसाई, शंतनु गुर्जर, अमित ठोंबरे, स्वप्निल राजिवडे, सौ. अनुराधा फुकणे, प्रवीण करडिले यांनी पार पाडले. जसराज फुकणे या तरूण, तडफदार सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट चे बहुमूल्य सहकार्य लाभले.

भारतीय जनता पार्टीचे कोथरूड मंडळाचे अध्यक्ष संदीप बुटाला, प्रभाग  तेराचे सरचिटणीस विठ्ठल मानकर, सचिन मोकाटे, स्वप्निल राजिवडे, इंजिनिअरिंग सेलचे राजेंद्र फुकणे, सौ. अनुराधा फुकणे यांसह अंकुर प्रतिष्ठान च्या टीम मधील सदस्य ही उपस्थित होते.

सूत्रसंचालन  स्विकृत नगरसेविका ॲड्  सौ मीताली कुलदीप सावळेकर यांनी केले. प्रास्ताविक कुलदीप सावळेकर यांनी केले मान्यवरांचा परिचय राजेंद्र फुकणे यांनी करून दिला तर अंकुर प्रतिष्ठानच्या सभासदांनी सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सर्व आयटी व आयटीइएस  च्या मंडळींना बोलते करण्याचे काम डॉ. विक्रमसिंह देसाई यांनी कौशल्य पूर्ण रीतीने केले. मांडलेला प्रत्येक विचार नोंदवून घेण्याचे काम अमित ठोंबरे यांनी केले.
आभार सौ अनुराधा फुकणे यांनी मानले.

यावेळी दीपक शिकारपूर सर यांनी आवर्जून सांगितले की माननीय दादा हे खूप चांगल्या मताधिक्याने येत्या निवडणुकीमध्ये निवडून येतील आणि त्यात ह्या सर्व आयटी क्षेत्रातील कोथरूड मतदारसंघातील नागरिकांचा सहभाग विक्रमी असेल यावर इतर सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला अनुमोदन दिले व मताधिक्य लाख दीड लाख की त्याहून अधिक असेल याबाबत सर्वांची चर्चा रंगली.

पहिला कार्यक्रम हा जरी ५० जणांच्या छोट्या गटामध्ये झाला असता तरी सदर उपक्रमासाठी अंकुर ची एक स्वतंत्र कोअर टीम असून लवकरच त्यांची नावे व संपर्क क्रमांक सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येतील. जेणेकरून आपणही उपक्रम मध्ये सहभागी होऊ शकता असे देखील अंकुर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांनी सांगितले.

दर तीन महिन्याच्या अंतराने भेटून कामाचा आढावा घेत काम पुढे नेण्याचा संकल्प करत अल्पोपहाराचा आस्वाद घेत पुन्हा भेटूया म्हणत सर्वांनी एकमेकांची रजा घेतली

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading