श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज युवक संघटना पुणे यांच्या वतीने नवरात्रोत्सवा निमित्त भव्य कन्या पूजन!
पुणे : श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज युवक संघटना पुणे यांच्या आयोजनात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५१ कुमारींचे पूजन अत्यंत आनंद आणि उत्साहाने पार पडले. देवीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या तीन ते दहा वर्षे वयोगटातील कन्यांचे पूजन करत, नवरात्र उत्सवात त्यांचे अनमोल स्थान अधोरेखित करण्यात आले. या शुभ प्रसंगी युवक संघटनेने उपस्थित समाज बांधवांना कन्या पूजनाचे महत्व व त्याचा आध्यात्मिक अर्थ समजावून सांगितला.
पूजन समारंभानंतर समाज बांधवांनी प्रेमळ कन्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित केला. या प्रसंगी श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष श्री. मनोज आरसिद्ध आणि संपूर्ण कार्यकारणी सदस्यांनी उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला.
उत्कर्ष महिला मंडळाच्या वतीने सौ. सविता दिलीप काळोखे यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. अर्चना कोल्हापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे महत्व सांगून महिला मंडळाच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. श्रीकांत मिस्कीन, नारायण दगडू, राजेंद्र पवार, प्रभाकर आरसिद्ध आणि इतर मान्यवरांनी देखील सहभाग घेत कार्यक्रमाला एक वेगळा रंग चढवला.
युवा पिढीच्या सक्रिय सहभागाने समाजाच्या सांस्कृतिक परंपरांना एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न यंदाच्या नवरात्रोत्सवात दिसून आला. श्री. विशाल पवार, श्री. संदीप रंगापुरे, श्री. रोहन दामजी, श्री. महेश दामजी, श्री. निखिल आरसिद्ध, श्री. संजय वडनेरे, श्री. निलेश लोमटे, श्री. प्रशांत पवार कु. कुणाल पवार, कु. मयूर कटारे आणि इतर युवक सदस्यांनी समाजाच्या या महत्वपूर्ण सणात आपले अमूल्य योगदान दिले.
श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज युवक संघटना पुणे, ट्रस्ट, महिला मंडळ आणि वधू-वर सूचक मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या सोहळ्याला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. युवक संघटनेवर नेहमीच असेच प्रेम आणि सहकार्य ठेवा, आणि पुढील कार्यक्रमांमध्येदेखील आपली उपस्थिती अशीच वाढवा.
