Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

विजयादशमी शस्त्र पूजन उत्सव रविवारी

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग पुणे महानगर च्या वतीने विजयादशमी निमित्त शस्त्र पूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ताडीवाला रस्त्यावरील भारतीय रेल्वे खेळाचे मैदान येथे शस्त्र पूजन उत्सव आणि पथसंचलन होणार आहे, अशी माहिती भाग संघचालक विधीज्ञ प्रशांत यादव यांनी दिली.

उत्सवाला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक केदार गोखले, रा.स्व. संघाचे अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख दीपक विसपुते उपस्थित राहणार आहेत.विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस. यंदा संघ शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्ताने शस्त्र पूजन उत्सव आणि पथसंचलन होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading