Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

शिवदर्शनचे श्री लक्ष्मीमाता मंदिर लक्षावधी दिव्यांचा ‘लक्ष्मीमहाल’ विशेष आकर्षण

पुण्यातील शिवदर्शन परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौनिमित्त सजले असून लक्षावधी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा ‘लक्ष्मी महाल’ विशेष आकर्षण बनला आहे .हजारो भक्तांची येथे गर्दी उसळत असून श्री लक्ष्मीमाता मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. संपूर्ण मंदिराला नव्या रंगाने झळाळी आली आहे. मंदिराभवती आकर्षक भव्य कमानी उभारण्यात आल्या असून प्रशस्त मंडपही उभारण्यात आला आहे. मंदिरावर एल.ई .डी. लाईट्ससह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून साकारण्यात आलेला ‘लक्ष्मी महाल’ १०० हून अधिक कारागिरांनी सुमारे १ महिना कष्टपूर्वक तयार केला आहे. नैसर्गिक विविध सुवासिक लाखो फुलांची आरास मंदिरावर करण्यात आली आहे. मंदिराचे प्रांगण आकर्षक रांगोळीने सजवले गेले आहे. या व्यतिरिक्त मंदिराच्या भोवतालच्या परिसराची स्वच्छताही करण्यात आली आहे.

मंदिरातील श्री लक्ष्मीमातेची संगमरवरी मूर्ती अधिक तेजोमय दिसत आहे. येथे पूजा व आरती रोज होत असून धूप व उदबत्त्यांच्या मधुर वासांमुळे साऱ्या मंदिर परिसरात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवार दि. ०३ ऑक्टोबर रोजी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी ६.०५ वाजता विधिवत घटस्थापना येथे संपन्न झाली. श्री लक्ष्मीमातेला सोन्याच्या मुगुट, विविध सोन्याचे दागिने व सोन्याची आभूषणे यांसह चांदीची साडी यांनी सजवण्यात आले आहे.

येथे रोज सकाळी व संध्याकाळी श्री लक्ष्मीमातेची आरती तसेच प्रसाद वाटप होत असून नवरात्रौच्या कालावधीत रोज अनेक महिला मंडळांची भजने संपन्न होत आहेत. अष्टमीला होमही करण्यात येणार आहे. हे मंदिर भाविकांसाठी रोज सकाळी ६.०० ते रात्री १०.०० पर्यंत खुले असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे कॅमेरे बसवण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही चोख आहे. याच मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे कार्यक्रम व स्पर्धा होत आहेत. अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading