मध्यम आकाराच्या ९६ टक्के व्यवसायांनी जेन एआय ला दिले प्राधान्य, जगातील अन्य गोष्टींपेक्षा घेतली आघाडी : सॅपच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
पुणे : सॅप नाऊ या भारतातील दुसर्या सर्वांत महत्त्वपूर्ण अशा उपक्रमात या वर्षी सॅप ने मध्यम आकाराच्या एआय रिसर्चची घोषणा केली, या अंतर्गत २५० ते १५०० कर्मचारी असलेल्या ९६ टक्के मध्यम आकाराच्या संस्थांनी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (जेन एआय) चा वापर केला असून जगभरांतील अन्य कंपन्यांपैकी केवळ ९१ टक्के कंपन्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.या सर्वेक्षणात भारतातील ८०० कंपन्यांसह जगभरांतील १२,००३ व्यवसायांचे सर्वेक्षण करण्यात आले.
या संशोधना विषयी बोलतांना सॅपच्या भारतीय उपखंडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनीष प्रसाद यांनी सांगितले “ भारतातील मध्यम आकाराच्या कंपन्या या भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण घटक आहेत. एआय हे या कंपन्यांसाठी गेमचेंजर ठरते, यामुळे वेग, काम करण्यास योग्य विचार प्राप्त होऊन त्यांना डिजिटल अर्थव्यवस्थेकडे जाणे शक्य होते. सॅप सरख्या तंत्रज्ञान भागीदाराबरोबर काम करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरते कारण एआयने आधीच महत्त्वाच्या व्यावसायिक प्रक्रियांना शक्ती देण्याचे काम केले आहे. म्हणूनच प्रत्येक आकाराच्या भारतीय व्यवसायांसाठी बिझनेस एआय चे वचन सत्यात उतरवता येते.”
सॅपच्या भारतीय उपखंडाच्या मिडमार्केट चे प्रमुख आणि उपाध्यक्ष राजीव सिंग यांनी पुढे सांगितले “ एआय मध्ये व्यवसायांना हुशार विचार करण्याची क्षमता, ऑटोमेशन आणि उपकरणे उपलब्ध करुन देऊन जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम करण्याची संधी मिळते. आज जगभरांतील २७ हजारांहून अधिक ग्राहक हे सॅपच्या बिझनेस एआयचा वापर करुन त्यांचे कार्य सुधारुन रिअल टाईम पध्दतीने निर्णय घेण्यास सक्षम होत आहेत. उदाहरणार्थ, पीजीपी ग्लास, सुझलॉन एनर्जी आणि अशा अनेक भारतीय ग्राहकांनी त्यांच्या व्यवसायासाठी एआयच्या बदलाने युक्त क्षमतेचा लाभ घेतला आहे.”
भारतातील मध्यम आकाराचे व्यावसायिक हे जेन एआय च्या अंमलबजावणीला प्राधान्य हे मध्यम स्तरावर किंवा अधिक प्राधान्य देत असून (९६ टक्के) जगभरांतील अन्य व्यवसायांच्या तुलनेत ही सर्वाधिक आकडेवारी (९१टक्के) आहे.जेन एआयचा वापर (६६ टक्के) हा सायबरसुरक्षे चे धोके कमी करण्यासाठी (६७टक्के) आहे कारण भारतीय मध्यम आकाराच्या व्यवसायांकरता २०२४ मध्ये अधिक संस्थात्मक प्राधान्य देणे आवश्यक होते आणि त्यामुळे व्यावसायिक कार्य हे अधिक पर्यावरणस्नेही करता येईल (६५टक्के).
सर्वेक्षण केलेल्या अर्ध्याहून अधिक भारतीय मध्यम आकाराच्या कंपन्यांनी त्यांचा खाजगीपणा आणि सुरक्षेसाठी एआयला प्राधान्य दिले (५५ टक्के) आणि त्याच बरोबर निर्णयक्षमता सुधारण्यासाठी ही (५२ टक्के) कंपन्यांनीही जगभरांतील कंपन्यांच्या तुलनेत अधिक प्राधान्य दिले ( अनुक्रमे ५० टक्के आणि ४९ टक्के).
भारतीय मध्यम आकाराचे व्यवसाय सुध्दा एआयला त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्राधान्य देतांना दिसतात (५१ टक्के), त्याच बरोबर ग्राहकांचा अनुभव (५० टक्के) आणि पुरवठा शृंखलेसह वाहतूक यांत सुधारणा करण्यासाठीही प्राधान्य देत आहेत.
