Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRA

अपुरा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, पालिका अधिका-यांचे खासदारांना आश्वासन.

 

मुंबई : भांडुप, अप्पर खिंडीपाडा या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अपूरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे तक्रार केल्यावर या भागाची मनपा अधिका-यांमार्फत पाहणी करण्यात आली. अपुरा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन पालिका अधिका-यांनी यावेळी दिले.

भांडुप पश्चिम येथील अप्पर खिंडीपाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सततचा अपुरा पाणीपुरवठा होत होता. याबाबत अनेकदा तक्रार करुनही पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत होते. याबाबत खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे तक्रार केल्यावर पालिका अधिका-यांना जाग आली. तात्काळ त्यांनी शिवसेनेचे आमदार रमेश कोरेगावकर, युवासेना कार्यकारणी सदस्या राजोल संजय पाटील, माजी नगरसेविका दिपाली गोसावी यांच्यासह खिंडीपाडा भागाला भेट दिली. पुर्व उपनगर जलविभागाचे कार्यकारी अभियंता जेजे पाटील, बांधकाम जलविभागाचे सहाय्यक अभियंता फाटक, आशिष धुमाळ यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन अपुरा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन खासदार संजय दिना पाटील, आमदार रमेश कोरगावकर व राजोल पाटील यांना दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading