Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

रुबी मेट्रो स्टेशनचे माता रमाबाई आंबेडकर नामकरण करावे – अविनाश बागवे

 

पुणे : रूबी हॉल क्लिनीक पुणे येथील मेट्रो स्टेशनला माता रमाई आंबेडकर यांचे नाव द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मातंग एकता आंदोनाच्या वतीने माजी नगरसेवक व मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी दिला आहे .आज त्यांनी जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले .
वरील विषयांस अनुसरून आपणास या पत्राद्वारे प्रस्ताव सादर करीत आहोत की, पुणे शहरातील रूबी हॉल क्लिनीक, पुणे या ठिकाणी मेट्रो स्टेशन आहे. सदर मेट्रो स्टेशन लगत भारत देशातील माता रमाई आंबेडकर यांचा पहिला पुतळा उभारण्यात आलेला असुन सदर परिसरामध्ये मोठया प्रमाणात दलित नागरी वस्ती वास्तव्यास आहे. तरी या भागातीन हजारो नागरीकांच्या भावना लक्षात घेता सदर मेट्रो स्टेशनला रूबी हॉल क्लिनीक मेट्रोस्टेशन या नावा ऐवजी माता रमाई आंबेडकर मेट्रो स्टेशन हे नाव देण्यात यावे अशी मागणी आहे.

तरी सर्व नागरीकांच्या भावना लक्षात घेता आपण या नावात त्वरीत बदल करावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन केले जाईल .अशा इशारा दिला आहे .यावेळी यावेळी मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे ,विठ्ठल थोरात,अॅड. राजश्री अडसूळ,अध्यक्ष पुणे शहर मं.ए. आ महिला,अध्यक्ष पुणे शहर सौ. सुरेखा खंडाळे ,सरचिटणीस दयानंद अडागळे, अरुण गायकवाड,शहर कार्याध्यक्ष रमेश सकट, डॉ. रमाकांत साठे यासह पुणे शहरतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading