लघुपटांसाठी कायमस्वरूपी व्यसपीठ निर्माण व्हावे – मृणाल कुलकर्णी
पुणे:- समाज माध्यमांमुळे लघुपटा कडे प्रेक्षक वर्ग मोठया प्रमाणावर वळत असून दर्जेदार लघुपट पाहता येण्यासाठी कांयम स्वरूपीय व्यासपीठाची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे मत सुप्रसिध्द अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका आणि लेखिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
आशय फिल्म क्लब, फिल्म फेस्टीवल कंपनी आणि अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या ‘मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’चे उद्घाटन आज सुप्रसिध्द अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका आणि लेखिका मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
प्रभात रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय चित्रपटगृहात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे व्यवस्थापक जसबिर सिंग, सुप्रसिध्द संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी तसेच महोत्सव संयोजक व फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव, महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक जय भोसले, व्यवस्थापकीय संचालक रश्मिता शहापूरकर, प्रमुख सचिव डॉ. विश्वास शेंबेकर, क्रिएटीव्ह हेड अभिषेक अवचार आदी मान्यवर उपस्थित होते.
शनिवार २८ सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात ८१ लघुपट पहाण्याची सुवर्णसंधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे.
यावेळी बोलताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की, कमी कालावधीत जास्त आशय व्यक्त करण्याचे लघुपट हे उत्तम आणि प्रभावी माध्यम आहे . मनोरंजनाचे अनेक पर्याय सहज उपलब्ध झाल्याने प्रेक्षकांची कोणत्याही कलाकृतीवर लक्ष केंद्रित होऊन ती एकाग्रता टिकून राहण्याचा कालावधी पूर्वी पेक्षा तुलनेने कमी झाला आहे . अशा पार्श्वभूमीवर आपली कलाकृती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लघुपट उत्तम पर्याय ठरत आहे . मुख्य म्हणजे आशय आणि सादरीकरणाच्या पातळीवर कोणतीही तडजोड न करता ।लघुपट निर्मिती ही बजेट फ्रेंड्रली असते . तसेच चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हांला जो काही विचार समाजा पर्यंत पोहचवायचा आहे तो सरळ मांडण्यात मर्यादा असून तो विचार पोहचविण्यासाठी चित्रपट या माध्यमाच्या आवश्यकते नुसार त्यात गाणी आणि प्रसिध्द अभिनेता यांच्या सहकार्याने मनोरंजनात्मक पद्धत्तीने तो विचार प्रेक्षकां पर्यंत पोहचावा लागतो . लहुपट निर्मितीच्या बाबतीत चित्रपट निर्मितीचे कोणतेही निकष आवश्यक नसल्याने कमीत कमी वेळात थेट मुद्दयाला हात घालता येतो . लघुपटाचे विषय थेट मनाला भिडतात . लघुपट निर्मात्यांनी लघुपट निर्मितीच्या पॅशन सोबतच थोडे पेशन्स ही ठेवल्यास त्यांना नक्कीच यश मिळेल .
यावेळी बोलताना डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले की, लघुपट निर्मात्यांना फिचर फिल्म आणि लघुपट निर्मिती यातील फरक नक्की माहित असतो . लघुपट निर्मिती म्हणजे रिल ही नाही आणि फिचर फिल्म ही नसते . लहुपट निर्मिती ही वेगळी ताकद आहे .
महोत्सव संयोजक व फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव म्हणाले, जागतकिकरणा नंतरचा युवक त्याच्या वेदना आणि संवेदना दृक-श्राव्य माध्यमाद्वारे व्यक्त करू लागला आहे .या निर्मिती प्रक्रिये मागे एन.एफ.डी.सी .ने पूर्ण आर्थिक पाठबळ देणे आवश्यक आहे .मुळात याच उद्देशाने एन.एफ.डी.सी ची निर्मिती करण्यात आली होती .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे व्यवस्थापक जसबिर सिंग यांनी यावेळी राष्ट्रीय चित्रपट संग्राहलया कडून चित्रपट जतन करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नां बाबत माहिती दिली . तसेच योग्य व्यासपीठावर प्रश्न मांडून लघुपट निर्मितीसाठी आर्थिक पाठबळ उभे करण्यात येईल असे आश्वासन दिले .
